ड्राय फ्रूट्स आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. त्यातही अंजीराला विशेष महत्त्व आहे. अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, फायबर आणि शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. तुम्ही अंजीर कसेही खाल्ले तरी फायदा होतोच. पण रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर खूप जास्त आरोग्यदायी फायदे मिळतात. विशेषतः ज्यांना बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि पचनाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी भिजवलेले अंजीर नैसर्गिक औषधासारखे काम करते. रात्रभर पाण्यात भिजल्यामुळे अंजीर खूप मऊ होते आणि पचायला सोपे जाते.
23
अंजीरचे आरोग्यदायी फायदे
१. पचनसंस्था सुधारते: भिजवलेल्या अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत काम करते. रोज भिजवलेले अंजीर खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
२. हाडे मजबूत होतात: हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक अंजीरमध्ये भरपूर असतात. आहारात अंजीराचा समावेश केल्यास हाडांची घनता आणि शक्ती वाढते.
३. हृदयाचे आरोग्य जपते: अंजीरमधील पोटॅशियम रक्ताठोकळा आणि रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसंच यातील फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदय निरोगी ठेवते.
४. वजन कमी करण्यास मदत: जास्त फायबरमुळे अंजीर खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे मध्येच लागणारी भूक आणि जंक फूड खाण्याची सवय कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
५. त्वरित ऊर्जा मिळते: अंजीरमध्ये नैसर्गिक साखर आणि आवश्यक पोषक घटक असतात. सकाळी उठल्यावर भिजवलेले अंजीर खाल्ल्याने दिवसभर ताजेतवाने आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी ताकद मिळते.
33
सकाळी उपाशी पोटी खा
रात्री झोपण्यापूर्वी २ ते ३ वाळलेले अंजीर एका पेल्यात पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे भिजवलेले अंजीर व्यवस्थित चावून खा आणि ते पाणीसुद्धा प्या. या छोट्या सवयीमुळे अंजीर सहज पचते आणि शरीराला त्यातील पोषक घटक लगेच शोषून घेता येतात. रोजच्या आहारात भिजवलेल्या अंजीराचा समावेश केल्यास पचनक्रिया, हृदयाचे आरोग्य आणि हाडांची ताकद वाढते.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.