Guru Purnima निमित्त शिर्डीतील साईबाबांचे घरबसल्या घ्या दर्शन, पाहा PHOTOS
Guru Purnima 2024 : गुरुपौर्णिमेचा उत्सव 21 जुलैला संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरातही गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी साईबाबांचे घरुनच दर्शन तुम्हाला घेता येईल.
आज (21 जुलै) साजरा केल्या जाणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही घरबसल्या शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेऊ शकता. गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या मंदिरात प्रत्येक वर्षी विशेष उत्सवाचे आयोजन केले जाते.
गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या चरणी लीन घ्या
शिर्डीतील साईबाबा अनेकांच्या श्रद्धेचे स्थान आहेत. यामुळेच देश-विदेशातून भाविक शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षभर येत असतात.
शिर्डी नगरी साईंच्या गजराने दुमदमली
गुरुपौर्णिमेनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी यायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण शिर्डी मंदिराच्या परिसरात साईबाबांचा गजर केला जात आहे.
घरबसल्या शिर्डीतील साईबाबांचे दर्शन
देशभरातील भाविकांना गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घरबसल्या घेता येणार आहे. यासाठी मंदिराच्या अधिकृत फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्रामच्या माध्यमातून साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊ शकता.
मंदिराला विशेष सजावट
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीतील साईबाबा मंदिराला विशेष सजावट करण्यात आली आहे. साईबाबांच्या गाभाऱ्यापासून ते एण्ट्री गेटपर्यंत सुंदर अशी विविध रंगी फुलांची सजावट खास गुरुपौर्णिमेनिमित्त केली आहे.
शिर्डी साईबाबा मंदिरात विशेष उत्सवाचे आयोजन
शिर्डीती साईबाबा मंदिरात प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेनिमत्त विशेष उत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी भजनासह अन्य वेगवेगळे उपक्रम मंदिर परिसरात राबवले जातात.