येत्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जामार आहे. या दिवशी गुरु ग्रहासंबंधित काही गोष्टी दान करण्याचे महत्व आहे. यामुळे आयुष्यात सुख-आनंद कायम टिकून राहतो.
गुरु पौर्णिमेच्या दिवशी चणे, डाळ, तूर डाळ याचे दान करू शकता. याशिवाय अन्नदानही करू शकता.
बेसनाच्या पीठापासून तयार केलेले काही पदार्थ तुम्ही गुरुपौर्णिमेला तयार करुन दान करू शकता. याशिवाय भगवान विष्णूलाही बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता.
गुरु पौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगातील वस्र गरजूंना दान करा. यामुळे आयुष्यात सुख-शांती आणि समृद्धी कायम टिकून राहिल. याशिवाय वैवाहिक आयुष्यही आनंदी राहिल.
गुरु पौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या फळांचे दान करा. जसे की, केळी, मोसंबी. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु ग्रह अशुभ स्थितीत आहे त्यांनी हा उपाय नक्की करावा.
गुरु ग्रह कुंडलीत मजबूत करण्यासाठी केशर, हळद, मक्याचे पीठ, मनुका, पिवळे चंदन याचे दान करू शकता. हे उपाय गुरुपौर्णिमेला करण्याचे फार महत्व आहे.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.