Guru Purnima यंदा कधी? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्तासह पूजा-विधी

Guru Purnima 2024 : गुरु पौर्णिमेच्या दिवशी दुर्मिळ योगायोग आला असून याचे महत्व अधिक वाढले जामार आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीची सुरुवात 20 जुलैला संध्याकाळी 05 वाजून 59 मिनिटांनी सुरु होणार आहे.

Chanda Mandavkar | Published : Jul 19, 2024 5:38 AM IST

Guru Purnima Date and Puja Vidhi : हिंदू धर्मात गुरु पौर्णिमेला अत्यंत महत्व आहे. प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवसाला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा नावानेही ओखळले जाते. यंदा गुरुपौर्णिमा येत्या 21 जुलैला साजरी केली जाणार आहे. या दिवसाला गुरु आणि शिष्यामधील पवित्र संबंधाच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. याशिवाय गुरुपौर्णिमेला शिष्य आपल्या गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान करतात. यंदाच्या गुरुपौर्णिमेला दुर्मिळ योगायोग जुळून आल्याने याचे अधिक महत्व वाढले गेले आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात 20 जुलैला संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी होणार असून 21 जुलैला दुपारी 03 वाजून 46 मिनिटांनी संपणार आहे.

अशी करा पूजा
गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करत स्वच्छ वस्र परिधान करा. यानंतर आपल्या गुरु अथवा त्यांच्या मुर्तीची पूजा करता. पूजेवेळी चंदन, अक्षता, फूल, धूप, दिवा आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा. या दिवशी आपल्या गुरुंप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करत त्यांचे आभार माना. याशिवाय भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना करा. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते.

दरम्यान, गुरुच्या प्रति सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमा अत्यंत खास मानली जाते. या दिवशी सर्वजण आपल्या गुरुसमोर नतमस्कत होत त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. याशिवाय आपल्या गुरुंनी आयुष्य जगण्यासाठी दिलेला मंत्र कायम स्मरणात ठेवून त्यानुसार वागण्याचा संकल्प करतात.

गुरु पौर्णिमेचे महत्व
गुरु पौर्णिमेला भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरांमध्ये अत्याधिक महत्व आहे. या दिवशी महर्षी वेदव्यास जयंतीही साजरी केली जाते. महर्षींनी महाभारत लिहिले होते. या दिवशी गुरुंची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि ज्ञानप्राप्ती होते असे म्हटले जाते.

गुरु पौर्णिमेला दानाचे महत्व
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केल्या जाणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानाचे फार महत्व आहे. या दिवशी तुम्ही गरजूंना अन्न, धान्य, वस्र दान करावे. तुमच्या कुंडलीत चंद्र दोष असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगातील वस्तू जसे की, दूध, दही, साखर यांचे दान करु शकता. याशिवाय चंद्राची पूजा करत त्याच्या मंत्रांचा जाप करू शकता. हे उपाय केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

आणखी वाचा : 

Guru Purnima च्या दिवशी दान करा या 5 गोष्टी, मिळेल नशीबाचे फळ

Chaturmas 2024 : पुढील चार महिने शुभ कार्य करणे वर्ज्य, वाचा चातुर्मासातील नियम

Share this article