संध्याकाळच्या नाश्तासाठी गोबी मंच्युरियन रेसिपी तयार करू शकता. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर जाणून घेऊया...
Gobi Manchurian Recipe : स्ट्रीड फूडमध्ये गोबी मंच्युरियन सर्वजण आवडीने खातात. यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केला जातो. अशातच घरच्याघरी 15 मिनिटांत होणारी गोबी मंच्युरियनची रेसिपी तयार केली जाते.
साहित्य
गोबी मंच्युरियन ग्रेवी कशी तयार करायची
स्टेप 1 : मंच्युरियन बनवण्यासाठी, प्रथम गोळे तयार करावे लागतात. यासाठी, फ्लॉवरचे तुकडे स्वच्छ करा, किसून घ्या आणि बाजूला ठेवा. नंतर लसूण आणि भिजवलेल्या लाल मिरच्या मिक्सर जारमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. आता एका भांड्यात किसलेला कोबी लसूण-मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, काळी मिरी, मीठ, सोया सॉस, लाल मिरची सॉस, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले, मैदा आणि कॉर्न फ्लोअरमध्ये मिसळा. पीठ एका प्लेटमध्ये सेट करा आणि 10-15 मिनिटांसाठी वाफवून घ्या. जेणेकरुन फ्लॉवरमधील कच्चेपणा दूर होईल.
स्टेप 2 : आता ग्रेव्ही तयार करा. यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात आले, लसूण, चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेली शिमला मिरची घाला. मिश्रणाला हलका तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्या. मिश्रण फक्त मध्यम आचेवर शिजवावे जेणेकरून ते जळणार नाही हे लक्षात ठेवा. आता मीठ, काळी मिरी, टोमॅटो केचप, सोया सॉस, लाल मिरची सॉस, लसूण-मिरची पेस्ट घालून चांगले मिसळा. आता एका लहान भांड्यात एक चमचा कॉर्न फ्लोअर आणि एक चमचा पाणी मिसळा आणि ते पॅनमध्ये घाला. यामुळे ग्रेव्ही घट्ट होईल. आता ग्रेव्ही 5 मिनिटे शिजवा. यामध्ये तळलेले मंच्युरियन बॉल्स मिक्स करा आणि सर्व्ह करा.
आणखी वाचा :