पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडे मजबूत करतात. ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) टाळण्यासाठी नियमित पालेभाज्या खाव्यात.
पालक आणि चुकंदर भाजी यामध्ये लोह (Iron) भरपूर प्रमाणात असते, जे हीमोग्लोबिन वाढवते आणि अशक्तपणा दूर करते. रक्ताची कमतरता असल्यास पालेभाज्या खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
पालेभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि पोट साफ राहते. वजन कमी करण्यासाठी पालेभाज्या उत्तम पर्याय आहेत.
मेथी आणि आळू भाजी रक्तदाब नियंत्रणात ठेवते. फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुळे कोलेस्टेरॉल कमी होतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.