दररोज किमान २.५ ते ३ लिटर पाणी प्या. पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि अन्न पचायला मदत होते. कमी पाणी प्यायल्यास भूक जास्त लागते आणि अनावश्यक खाणं होतं.
दररोज किमान ३०-४५ मिनिटे व्यायाम करा. उन्हाळ्यात जास्त गरम होत असल्याने हलके व्यायाम प्रकार निवडा
झोप कमी झाली तर भूक वाढते आणि वजन वाढू शकतं. रात्री उशिरा खाणे टाळा – पचन प्रक्रियेसाठी हे हानिकारक असते.
तणावामुळे बऱ्याचदा जास्त खाण्याची इच्छा होते, त्यामुळे ध्यान (Meditation) किंवा छंद जोपासा. कमी झोप आणि जास्त तणावामुळे शरीरात कोर्टिसोल (Cortisol) हार्मोन वाढते.