Gardening ची हौस असेल तर या झाडांपासून सुरवात करा , उन्हाळ्यात घर राहील थंड

जर तुम्ही नुकतेच बागकाम सुरू केले असेल आणि किचन गार्डनिंगची शिकत असाल,तर तुम्हाला रोपे निवडण्यात अडचणी येऊ शकतात.अशा परिस्थितीत  तुमच्यासाठी घरात लावायच्या रोपांची यादी घेऊन आलो ,जे बाग तर सुंदर बनवतातच पण उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासही मदत करतात 

 

Ankita Kothare | Published : Apr 18, 2024 11:14 AM IST
19
कोरफड

कोरफड या रोपात [औषधी गुणधर्म आहेत. माणसाच्या आरोग्या बरोबरच घराचे तापमान थंड ठेवण्यास देखील मदत होते. तसेच कोरफड हवेतील विषारी पदार्थ दूर करून हवा शुद्ध करण्याचे काम करते.परिणामी घरात थंडावा राहतो.

29
गोल्डन पोथोस

गोल्डन पोथोस ही एक अद्भुत वनस्पती आहे.यामध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्याची उत्तम क्षमता आहे.त्यामुळे घरातील वातावरण थंड आणि प्रसन्न राहते. तसेच गोल्डन पोथोसला तुम्ही कुठेही टांगू शकता किंवा डेकोरेटिव्ह प्लांट म्हणून पण याचा उपायोग करू शकता.

39
स्‍नेक प्लांट

स्नेक प्लांट ही अतिशय फायदेशीर झाड असून तापमान कमी करण्यास अत्यंत उपयुक्त आहे. तसेच हवेतील वाढतेप्रदूषण पाहता या झाडाचा गुणधर्म अत्यंत महत्वाचा आहे. कारण हवेतील विषारी पदार्थ शोधून घेत हवा शुद्धीकरणाचे काम हे झाड करत असते. जेणे करून तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न आणि थंड राहील.

49
फिकस ट्री

फिकसच्या झाडाला वीपिंग अंजीर असेही म्हणतात. ही एक अतिशय फायदेशीर वनस्पती आहे. ते हवा शुद्ध करते आणि उष्णता शोषून घेते. याशिवाय तुम्ही ते घरातही ठेवू शकता. यासाठी कमी प्रकाश आणि कमी पाणी लागते. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ते उपयुक्त आहे.

59
मोगरा

वसंत ऋतूपासून मोगऱ्याला बाहेर येतो असं म्हंटल जात. त्याची फुले अतिशय सुंदर आणि सुगंधी असतात. वसंताच्या गर्मीत होरपळत असताना मोगऱ्याचा सुवास घरातील वातावरण प्रसन्न करतो आणि परिणामी घराला थंडावा मिळतो.

69
बेबी रबरप्लांट

बेबी रबर प्लांट उन्हाळ्यात लावणे आवश्यक आहे. ही वनस्पती घराला थंड ठेवते. हे एक इनडोअर प्लांट आहे. त्याला नियमित पाणी देण्याची गरज नाही.

79
बोगन वेल

बोगन वेल ही वनस्पती तुम्हाला कुठेही आढळून येते. खरंतर भर उन्हात याला फूलं येतात आणि याची सावली घनदाट असल्याने घरात थंडावा निर्माण होतो आणि आसपासचा परिसरात हवा खेळती राहते.

89
घोळ

यालामराठीमध्ये घोळ तर इंग्रजीत पोर्टुलाका असे म्हणतात. या वेलाला अनेक रंगांची फुलं येतात. दिसायला देखणं आणि टुमदार असल्याने सगळ्यांच्याच पसंतीस पडत पण ही वनस्पती देखील घरातील वातावरण थंड करण्याचे काम करते.

99
हर्ब्स

उन्हाळ्याच्या उष्ण हवामानात अनेक औषधी वनस्पती वाढतात. तुळस, कोथिंबीर, पुदिना ही काही उदाहरणे आहेत. त्यांना भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक असते. मात्र उन्हाळ्यात पाण्यात किंवा ज्यूसमध्ये याचे सेवन केले जाते त्यामुळे या वनस्पती घरातील बागेत आवश्यक आहे

Share this Photo Gallery