
Garba Night Hairstyle : गरबा नाईट सुरू झाली आहे आणि अशावेळी आउटफिटसोबत कोणती हेअरस्टाईल करावी जी ट्रेंडी आणि क्लासी दिसेल, हे समजत नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास गरबा स्पेशल हेअरस्टाईल घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला सुंदर आणि फंकी लूक देतील. याला तुम्ही बोहो हेअरस्टाईल देखील म्हणू शकता, जी तुमच्या चनिया चोळीचे सौंदर्य वाढवेल. या सर्व हेअरस्टाईल्स या वर्षीच्या ट्रेंडी हेअरस्टाईल्स आहेत, ज्या केवळ दिसायलाच छान नाहीत तर बनवायलाही तितक्याच सोप्या आहेत.
गरब्यामध्ये साधा बन नाही, तर काहीतरी युनिक आणि फंकी असेल तर खूप छान वाटतं. अशाप्रकारे चनिया चोळीसोबत सेलिब्रिटी लूक हवा असेल किंवा तासनतास गरबा खेळण्याचा प्लॅन असेल, तर हा हेअर लूक परफेक्ट आहे. यामध्ये मल्टी कलर धाग्याला वेणी किंवा केसांसोबत गुंफून पिनांच्या साहाय्याने बन बनवून सेट केले आहे. तुम्ही याला अधिक युनिक लूक देण्यासाठी मध्ये आरसे, कवड्या किंवा पोम-पोम लावू शकता.
कर्ली केस असणाऱ्यांसाठीही आम्ही काहीतरी घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्ही अशाप्रकारे पुढून केस सेट करून मागे घेऊ शकता. तुम्ही समोरून बारीक वेण्या घालून त्या वेण्यांमध्ये मल्टी कलर धागे गुंफू शकता. सर्वांना मागे आणून मल्टीकलर धागे किंवा फंकी थ्रेड ॲक्सेसरीजने फिक्स करा.
केस मोकळे ठेवायचे नसतील तर अशाप्रकारे पोनीटेल हेअर लूकही छान दिसेल. यासाठी तुम्ही केसांमध्ये पुढून वेणी घाला किंवा स्लीक लूक तयार करा. आता मागून केसांना थ्रेडवाली ॲक्सेसरीज किंवा पोनीटेलने फिक्स करा. केसांना कलरफुल लूक देण्यासाठी मध्ये-मध्ये पोम-पोम देखील लावू शकता.
ब्रेडेड हेअरस्टाईल त्या लोकांसाठी परफेक्ट आहे, ज्यांना बन किंवा मोकळे केस ठेवायला आवडत नाही. यासाठी केसांची साधी वेणी घाला आणि त्यावर मल्टीकलर लेस किंवा मल्टी कलरमधील आरसे असलेली लेस लावा. आता तुम्ही खाली रंगीबेरंगी पोम-पोम असलेले लटकन लावून आपला लूक पूर्ण करू शकता.