कसबा गणपती पुण्यातील ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. कसबा पेठेत असणारा हा गणपती पेशवेकालीन असून त्याचे मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती साडेतीन फूट उंचीची आहे. आधी ती खूप लहान होती मात्र शेंदूर लेपून ती मोठी करण्यात आली आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे असे म्हटले जाते. वर्ष 1636 मध्ये शहाजी राजांनी लालमहाल बांधला त्यावेळी त्याच्याच बाजूला जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जायचे.
कसे पोहोचाल : 159, कसबा पेठ रोड, यशोदत्त हाउसिंग सोसायटी, फडके हौद, कसबा पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011