Ganesh Chaturthi 2024 : मुंबईतील 8 प्रसिद्ध गणपती मंडळ, वाचा कुठे व कसे पोहोचाल
Mumbai Famous Ganpati Mandal : येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धूम पहायला मिळते. याशिवाय काही प्रसिद्ध मंडळांचे गणपती पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. जाणून घेऊया मुंबईतील काही प्रसिद्ध गणेश मंडळ…
प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यावेळी गणरायाची मोठ्या भक्तीभावने पूजा-प्रार्थना करतात. हिंदू धर्मात गणपतीची बुद्धिची, समृद्धीची देवता मानले जाते. यंदा गणेशोत्सवाचा सण येत्या 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. गणेशोत्सवाची धूम मुंबईत दिसून येते. अशातच मुंबईतील काही प्रसिद्ध गणेश मंडळांसह तेथील गणपती पाहण्यासाठी कसे पोहोचायचे याबद्दल जाणून घेऊया....
29
फोर्टचा राजा
मुंबईतील फोर्ट येथे 50 वर्षांहून अधिक काळ गणपतीची स्थापना करणारे मंडळ आहे. फोर्टचा राजा मुंबईत प्रसिद्ध गणपतींपैकी एक आहे. गणेशोत्सवावेळी दूरदूरवरुन भाविक फोर्टच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात.
कुठे : फोर्ट, मुंबई कसे पोहोचाल : द्वारकादास एलएन, बोराबाजार परिसर, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र 400001
39
खेतवाडी
मुंबईतील खेतवाडीच्या गल्ल्यांमध्ये गणपतींचे दर्शन घेता येईल. खेतवाडीचा गणराज, खेतवाडीचा एकवीसमुखी गणपती, खेतवाडीचा मोरया असे काही गणपती तुम्हाला पहायला मिळतील. भव्य दिव्य गणपतींची मुर्ती पहायची असल्यास नक्कीच खेतवाडींच्या गणपतींचे दर्शन घेऊ शकता.
कुठे : खेतवाडी कसे पोहोचाल : ग्रँट रोड खेतवाडी मागील रस्ता आणि 12वी लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
49
परेलचा राजा, नरे पार्क
परळ सारख्या गिरणगावात, सामान्य गिरण कामगारांनी चालविलेला ‘परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क, परळचा राजा‘ ही संस्था यावर्षी 78 वे वर्ष साजरे करत आहे. सन 1947 साली गणेशोत्सव मंडळाने गणपती उत्सवाची सुरूवात केली होती. लालबाग-परळ भागात परेलच्या राजाचे दर्शन घेता येईल.
कुठे : नरे पार्क, परळ कसे पोहोचाल : अभय शिका, भिवाजी राव नरे उद्यान, नरे पार्क, परळ (पूर्व), मुंबई – ४००१२
59
मुंबईचा राजा, गणेशगल्ली
वर्ष 1928 रोजी लालबाग सर्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना पेरुची चाळ येथे केली. प्रथम हा उत्सव फक्त पाच दिवस साजरा केला जायचा. पण आज दहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. मुंबईतील राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. लालबागच्या परिसरात असणाऱ्या मुंबईच्या राजासाठी भव्यदिव्य आरास केली जाते.
कुठे : लालबाग कसे पोहोचाल : 1, गणेश नगर Ln, लालबाग, परळ, मुंबई, महाराष्ट्र 400012
69
जी. एस. बी. सार्वजनिक गणेशोत्सव समिती
मुंबईतील वडाळा येथील सर्वाधिक श्रीमंत आणि सोन्याने मढलेल्या गणपतीमध्ये जी.एस.बी गणपतीची ओखळ आहे. गणपतीची मुर्ती आकर्षक असून डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याच्या आभूषणांनी नटलेली दिसते. यंदा जी. एस. बी. सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे 70 वे वर्ष आहे.
कुठे : वडाळा, मुंबई कसे पोहोचाल : द्वारकानाथ भवन, श्री राम मंदिर परिसर, कात्रक रोड, वडाळा, मुंबई - 400031
79
लालबागचा राजा
नवसाला पावणारा मुंबईतील गणपती म्हणून ओखळ असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी तुफान गर्दी होते. सेलिब्रेटी ते सामान्य नागरिक लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतात. यंदा मंडळाचे 91 वे वर्ष आहे.
कुठे : लालबाग कसे पोहोचाल : चिंचपोकळी रेल्वेस्थानकातून उतरल्यानंतर लालबागचा परिसर लागतो. येथेच चिवडा गल्लीत लालबागचा राजाचे मंडळ आहे.
89
चिंतामणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन ते विसर्जनाची मोठी धूम लालबाग-चिंचपोकळीच्या परिसरात पहायला मिळते. येत्या 31 ऑगस्टला चिंतामणीच्या आगमनाचा भव्य सोहळा पार पडणार आहे.
कुठे : चिंचपोकळी कसे पोहोचाल : दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी, मुंबई, महाराष्ट्र 400012. चिंचपोकळी रेल्वे स्थानकाबाहेरच चिंतामणी गणपतीचे मंडळ आहे.
99
अंधेरीचा राजा
नवसाला पावणारा अंधेरीचा राजा मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळांपैकी एक आहे. अंधेरीच्या राजाला विराजमान करण्यासाठी मोठी आरास केली जाते. या मंडळाकडून लाइव्ह दर्शन देखील करू शकता.
कुठे : अंधेरी कसे पोहोचाल : आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती, गणेश मैदान, आझाद नगर II, वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400053