Janmashtami 2024 : बाळगोपाळला सजवण्यासाठी वस्रांचे पाहा खास डिझाइन
Laddu Gopal Shringar : जन्माष्टमीचा उत्सव वर्षातील मोठ्या सणांपैकी एक आहे. या दिवशी देशभरात कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. याशिवाय बाळकृष्णाचा खास श्रृंगार केला जातो. यंदाच्या बाळगोपाळला सजवण्यासाठी काही खास वस्रांचे डिझाइन पाहूया...
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदा 26 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी बाळकृष्णाची विशेष पूजा करण्यासह त्याचा खास श्रृंगार केला जातो. मंदिरांसह बहुतांशजणांच्या घरात बाळकृष्णाच्या मुर्तीच्या पूजेवेळी खास वस्र परिधान केले जाता. मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्नचे बाळकृष्णाचे वस्र तुम्हाला खरेदी करता येतील. यामधीलच काही खास डिझाइन पाहूया.
जरदोजी वर्क करण्यात आलेले वस्र
जन्माष्टमीचा उत्सव देशभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी घरातील बाळगोपाळाच्या मुर्तीला खास वस्र परिधान करायचे असल्यास जरदोजी वर्क करण्यात आलेल्या वस्राचे डिझाइन पाहू शकता. अशाप्रकारचे वस्र मार्केटमध्ये 500 रुपयांपासून खरेदी करता येतील.
मोती आणि डायमंड डिझाइन वस्र
जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्ण सुंदर दिसण्यासाठी मोती आणि डायमंडचे डिझाइन असणारे वस्र खरेदी करू शकता. या वस्रांवर देखील वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्न दिसून येतील.
सोनेरी रंगातील वस्र
बाळकृष्णाच्या भक्तांसाठी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव फार महत्वाचा असतो. या दिवसाच्या तयारीची सुरुवात आतापासूनच केली जात आहे. जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचा श्रृंगार करण्यासाठी सोनेरी रंगातील वस्राचे डिझाइन पाहू शकता. अशाप्रकारचे वस्र 500 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
बांधणीचे वस्र
बांधणीच्या कापडाच्या वस्रामध्ये बाळकृष्ण अत्यंत सुंदर दिसेल. याशिवाय बाळकृष्णाला फेटा देखील घाला. बांधणीच्या कापडाचे वस्र वेगवेगळ्या रंगामध्ये आणि डिझाइनमध्ये मार्केटमधून खरेदी करता येतील.
मोरपंखाचे वस्र
मोरपंख बाळकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. यंदाच्या जन्माष्टमीवेळी कान्हाच्या श्रृंगारसाठी मोती आणि मोरपंखाने डिझाइन करण्यात आलेले वस्र परिधान करु शकता.