
Ganesh Chaturthi 2024 : सनातन धर्मात प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये गणपतीची मोठ्या भक्तीभावाने पूजा-आरती केली जातो. बाप्पाला दररोज नवी नैवेद्य, फुलांचा हार घालून त्याची पूजा केली जाते. येत्या 7 सप्टेंबरपासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच यंदाच्या गणशोत्सवावेळी घरी विराजमान झालेल्या बाप्पाला 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरच्याघरीच वेगवेगळ्या प्रकारची कंठी कशी तयार करु शकता हे पाहा.
गणेश चतुर्थीचे महत्व
गणपतीला बुद्धीच्या देवतेसह आराध्य दैवत मानले जाते. यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते. याशिवाय पुरणांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यामागील काही कथा सांगितल्या जातात. अशी मान्यता आहे की, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. यामुळेच गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
आणखी वाचा :
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाच्या 5 सोप्या आरती म्हणत व्हा भक्तिरसात तल्लिन
Jyeshtha Gauri Avahana : गौरीला 10 मिनिटांत या 5 वेगळ्या प्रकारे नेसवा साडी