Ganesh Chaturthi 2024 : GSB सेवा मंडळ ते मुंबईच्या राजाची पहिली झलक, VIDEO

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाची मोठी धूम सुरू झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची पहिली झलक भाविकांना पहायला मिळाली. पण मुंबईतील अन्य काही प्रसिद्ध गणपतींची पहिली झलक पाहिलीत का? 

Chanda Mandavkar | Published : Sep 6, 2024 2:35 AM IST / Updated: Sep 06 2024, 08:11 AM IST

Ganesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पाचे वाजत-गाजत मंडळांमध्ये स्वागत करण्यात आले. काही मंडळांकडून मंडपातच बाप्पाची मुर्ती तयार करतात. अशातच 7 सप्टेंबरपासून पुढील दहा दिवसांसाठी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची मोठी धूम मुंबईत पहायला मिळतेय. मुंबईतील काही प्रसिद्ध मंडळांनी गणपतीची पहिली झलक भाविकांना दाखवली. 

लालबागचा राजा: 
लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्याआधी त्याला 20 किलो सोन्याचा  कोणीतरी मुकुट अर्पण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय बाप्पाच्या डोक्यावर मुकुट घालत असल्याचेही दिसून येत आहे. 

मुंबईचा राजा: 
मुंबईचा राजा म्हणून ओखळ असणाऱ्या गणेशगल्लीतील बाप्पाची देखील पहिली झलक भाविकांना दाखवण्यात आली. डमरुवर उभा असणारा बाप्पा,  एक हात आशीर्वाद देताना, दुसऱ्या हातात बेलाचे पान, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात रुद्राक्षाची माळ अशी गणपतीची मुर्ती साकारली आहे. पायाजवळ भगवान शंकरही दिसून येत आहेत. लालबागच्या राजाप्रमाणे मुंबईच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

जीएसबी सेवा मंडळ, वडाळा
डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याने मढलेल्या बाप्पाची ओखळ असणाऱ्या जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीची पहिली झलक समोर आली आहे. बाप्पाची पहिली झलक दाखवताना त्याची आरती करण्यात आली. सर्व भक्तांनी व्यवस्थितीत बसून बाप्पाला आपल्या डोळ्यात आणि कॅमेऱ्यात कैद केले. 

ओम तांडव उत्सव मंडळ 
खेतवाडीमधील 10 व्या गल्लीतील ओम तांडव उत्सव मंडळाच्या बाप्पाचा प्रथम मुखदर्शन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि गायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी उपस्थिती लावली होती. 

मुंबईचा महाराजा
खेतवाडीमधील 11 व्या गल्लीतील मुंबईती महाराजाची पहिली झलक 06 सप्टेंबरला दाखवली जाणार आहे. बाप्पाची झलक पाहण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. 

आणखी वाचा : 

Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाच्या 5 सोप्या आरती म्हणत व्हा भक्तिरसात तल्लिन

बाप्पाच्या दर्शनासाठी मित्रपरिवाराला पाठवण्यासाठी आमंत्रण पत्रिकेचे Message

Read more Articles on
Share this article