Fridge Temperature in Winter : थंडीत फ्रिजचे तापमान किती असावे? जेणेकरुन आरोग्यासंबंधित समस्यांपासून रहाल दूर

Published : Nov 05, 2025, 03:15 PM IST

Fridge Temperature in Winter : हिवाळ्यात फ्रिजचे तापमान २°C ते ५°C तर फ्रीजरचे -15°C ते -18°C ठेवणे योग्य आहे. फ्रिज ओव्हरलोड न करता अन्न व्यवस्थित ठेवावे आणि दरवाजा वारंवार उघडू नये. गरम अन्न थंड करूनच फ्रिजमध्ये ठेवा. 

PREV
15
थंडीत फ्रिजचे तापमान किती असावे?

हिवाळ्यात बाहेरचे तापमान कमी असल्याने अनेकदा घरातील फ्रिजचे तापमान देखील योग्य प्रमाणात सेट करणे गरजेचे असते. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारवा टिकून राहत असल्याने फ्रिजमधील कूलिंग सिस्टमवर अतिरिक्त ताण येत नाही. मात्र, चुकीचा तापमान सेट केल्यास अन्न खराब होणे, फ्रिजमध्ये बर्फ जमा होणे किंवा फूड पॉइझनिंगची शक्यता वाढते. त्यामुळे हिवाळ्यात फ्रिजचे योग्य तापमान कायम ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे अन्नपदार्थ ताजे आणि सुरक्षित राहतील.

25
तापमान किती ठेवावे?

हिवाळ्यात फ्रिजची तापमान सेटिंग २°C ते ५°C (डिग्री सेल्सिअस) दरम्यान ठेवणे सर्वात योग्य मानले जाते. तर फ्रीजरचे तापमान -15°C ते -18°C असावे. या रेंजमध्ये तापमान ठेवल्यास फूड आयटम्स जास्त काळ टिकतात आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो. काही फ्रिजमध्ये ‘मिनिमम’ ते ‘मॅक्सिमम’ अशी रोटरी सेटिंग असते. अशा फ्रिजमध्ये हिवाळ्यात सेटिंग 1 ते 2 या स्तरावर ठेवणे योग्य ठरते. तापमान खूप कमी केल्यास फ्रिजच्या आत अति बर्फ जमा होते आणि फळे-भाज्यांमध्ये ओलावा वाढून ते सडू शकतात.

35
कोणते पदार्थ कोणत्या शेल्फमध्ये ठेवावेत?

हिवाळ्यातही फ्रिजमध्ये अन्न नीट रचणे आवश्यक आहे. दूध, दही, पनीर, मटण, मासे आणि अंडी हे पदार्थ जास्त तापमानास संवेदनशील असतात, त्यामुळे ते फ्रिजच्या मधल्या किंवा खालच्या शेल्फमध्ये ठेवा जिथे तापमान स्थिर असते. हिरव्या भाज्या आणि फळे ‘व्हेजिटेबल क्रिस्पर’ ड्रॉवरमध्ये सील करून ठेवा. फ्रिजचा दरवाजा वारंवार उघडू नका, कारण त्यामुळे तापमान अस्थिर होऊन अन्नाची क्वालिटी कमी होते. गरम पदार्थ लगेच फ्रिजमध्ये न ठेवता पूर्ण थंड झाल्यावरच ठेवा, अन्यथा फ्रिजच्या आतली कूलिंग सायकल असमतोल होऊ शकते.

45
हिवाळ्यात फ्रिज मेंटेन करण्याचे टिप्स

फ्रिज हिवाळ्यात जरी जास्त काम करत नसला, तरी त्याची योग्य साफसफाई आणि देखभाल करणे आवश्‍यक आहे. आठवड्यातून एकदा फ्रिजच्या आत ओलसर कपड्याने स्वच्छ करा आणि डीफ्रॉस्ट मोड असलेल्या फ्रिजमध्ये वेळोवेळी डीफ्रॉस्ट करा. रबर गॅस्केट, कूलिंग व्हेंट्स आणि कॉइल्सची सफाई केल्यास फ्रिजची कूलिंग क्षमता उत्तम राहते. जास्त वस्तू कोंबून न ठेवता एअर सर्क्युलेशन होईल इतकी जागा ठेवा. तसेच, फ्रिजला भिंतीपासून थोडा अंतर देणेही फायदेशीर ठरते.

55
तापमान खूप कमी केल्यास काय होते?

अनेकांना वाटते की तापमान जितके कमी ठेवले तितके चांगले, पण हिवाळ्यात असे करणे चुकीचे असते. तापमान फारच कमी ठेवल्यास दही पाण्यासारखे होणे, फळे-भाज्या सुकणे किंवा बर्फाची पातळ थर जमा होऊन त्यांच्या टेक्स्चरवर वाईट परिणाम होऊ शकतो. काही वेळा फ्रिज सतत चालल्यास वीज बिलही वाढते. योग्य तापमान सेटिंगमुळे फूड फ्रेश राहते आणि फ्रिजचे आयुष्यही वाढते.

Read more Photos on

Recommended Stories