साफ करताना कोळंबीमधील काळ्या रंगाचा धागा पूर्णपणे काढला आहे याची खात्री करा. हा कोळंबीचा पचनमार्ग असतो. तो खाणे सुरक्षित नाही.
जर कोळंबी योग्यप्रकारे धुवून स्वच्छ केली नाही आणि घाण काढली नाही, तर तिची चव कमी होण्याची शक्यता जास्त असते.
कोळंबी नेहमी चांगली शिजवल्यानंतरच खावी. यामुळे त्यातील जंतू नष्ट होण्यास मदत होते.
योग्यप्रकारे स्वच्छ न करता कोळंबी खाल्ल्यास ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे असे पदार्थ शिजवताना विशेष काळजी घ्यावी.
डोकं आणि शेपटीचा भाग काढल्यानंतर, काळ्या रंगाची घाण काढायला विसरू नका. घाण पूर्णपणे काढल्यानंतर कोळंबी चांगली धुवून घ्यावी.
Rameshwar Gavhane