बर्फाचा वापर करून उकडवा अंडी, ना फुटतील ना चिकटतील

अंडी उकडवताना काही वेळेस फुटली जातात किंवा तडकली जातात. अशातच बर्फाचा वापर करून अंडी उकडवून कधी पाहिलेयत का?

Egg Boiling Trick : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे...हे वाक्य लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत. अंड्याच्या सेवनाने आरोग्याला फायदे होतात. यामध्ये असणाऱ्या प्रोटीनमुळे हेल्दी आणि फिट राहण्यास मदत होते. अंड्यापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात. पण अंड उकडवून खाणे अधिक फायदेशीर असते. कारण यामधील पोषण तत्त्वे कमी होत नाहीत. मात्र अंडी उकडवताना काही वेळेस फुटली किंवा तडकली जातात. अशातच अंडी उकडवण्याची खास ट्रिक जाणून घेऊया...

अंडी उकडवण्याची खास ट्रिक

अंडी उकडवताना फुटू किंवा तडकू नये म्हणून बर्फाचा वापर करा. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर momsgupshup777 नावाच्या अकाउंटवर अंडी उकडवण्याची खास ट्रिक दिली आहे. अंडी उकडवण्यासाठी पोळ्या तयार करण्यासाठी वापरला जाणारा तवा वापरा. यावर अंडी ठेवून त्याच्या बाजूने बर्फाचे तुकडे ठेवून गॅस सुरू करा. बर्फ वितलळ्यानंतर अंडी तव्यामधून बाहेर काढा. अशापद्धतीने उकडलेली अंडी कधीच तुटत किंवा फुटली जात नाही.

 

अंडी उकडवण्याचे अन्य पर्याय

आणखी वाचा : 

हिवाळ्यात अंडी खाण्याचे काय आहेत फायदे, पोषण आणि उष्णतेची असते गरज

डायबिटीज पेशंटसाठी सुपरफ्रूट्स: ही फळं कंट्रोलमध्ये ठेवतील ब्लड शुगर!

Share this article