तुम्ही मैद्यापासून गुजराती पदार्थ भाकरवडीसुद्धा बनवू शकता. मैद्यात मीठ आणि मोहन घालून पीठ चांगलं मळून घ्या. आता भाकरवडीच्या सारणासाठी भाजलेलं बेसन, तीळ, ओवा, मीठ, काळं मीठ आणि चाट मसाला घालून मिश्रण तयार करा. मैद्याची पोळी लाटून त्यात हे सारण भरा आणि त्याचा रोल बनवा. त्याचे छोटे-छोटे तुकडे करून खरपूस तळून घ्या.