DIY Water Feeder: कडक उन्हाळ्यात पक्षांची तहान भागवा, घरीच बनवा हे 5 सोपे वॉटर फीडर

Published : Apr 07, 2026, 10:00 PM IST

DIY Water Feeder: कडक उन्हाळ्यात पक्षांना पाणी देण्यासाठी घरीच ५ सोपे DIY वॉटर फीडर बनवा. प्लास्टिकची बाटली, कुलहड, नारळाची करवंटी आणि जुन्या भांड्यांपासून हँगिंग बर्ड फीडर तयार करा आणि निसर्गाला मदत करा.

PREV
16
कडक उन्हाळ्यात पक्षांची तहान भागवा
उन्हाळ्यात जशी माणसांना वारंवार पाण्याची गरज भासते, तसेच लहान पक्षीही कडक ऊन आणि गरम वाऱ्यामुळे हैराण होतात. अनेकदा पाण्याअभावी त्यांची तहान भागत नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनी, टेरेस किंवा गार्डनमध्ये त्यांच्यासाठी पाण्याची सोय केली, तर हे एक खूप चांगलं आणि सोपं काम ठरू शकतं. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला महागडे बर्ड फीडर विकत घ्यायची गरज नाही. तुम्ही घरातल्या टाकाऊ वस्तूंपासूनच सुंदर आणि उपयोगी DIY वॉटर फीडर बनवू शकता. चला तर मग, जाणून घेऊया ५ सोप्या आणि क्रिएटिव्ह पद्धती.
26
प्लास्टिक बाटलीचा वॉटर फीडर

एखाद्या जुन्या प्लास्टिक बाटलीचा वापर करून तुम्ही एक साधं-सोपं वॉटर फीडर बनवू शकता. बाटलीला छोटी छिद्रं पाडा आणि त्यात पाणी भरा. ही बाटली झाडाला किंवा बाल्कनीमध्ये उलटी टांगा. यामुळे पाणी हळूहळू बाहेर येत राहील आणि पक्षी सहजपणे पाणी पिऊ शकतील.

36
मातीच्या कुलहडपासून फीडर मातीचं कुलहड (चहाचं लहान मडकं)

उन्हाळ्यात पाणी थंड ठेवायला मदत करतं. एक कुलहड घ्या, त्यात पाणी भरा आणि त्याला दोरीने बांधून लटकवा. हा एक नैसर्गिक आणि इको-फ्रेंडली पर्याय आहे, जो पक्षांना जास्त आवडतो.

46
नारळाच्या करवंटीचा वॉटर बाऊल

तुमच्याकडे नारळाची रिकामी करवंटी असेल, तर ती स्वच्छ करून त्यात पाणी भरा आणि दोरीने टांगून द्या. हा एक छोटा आणि आकर्षक फीडर तयार होतो, जो तुमच्या बाल्कनीचं सौंदर्यही वाढवतो.

56
स्टील किंवा प्लास्टिक बाऊल

हँगिंग फीडर एका साध्या बाऊलला छिद्र पाडून त्यात दोरी घाला आणि त्याला लटकवा. यात रोज ताजं पाणी भरा. हा सर्वात सोपा आणि झटपट तयार होणारा फीडर आहे. हे पण वाचा- जुन्या नेलपॉलिशच्या बाटल्यांपासून बनवा आकर्षक वस्तू, घर दिसेल सुंदर

66
जुन्या कपबशीपासून बनवलेले फीडर
जुना कप आणि प्लेटपासून फीडर जुना कप आणि प्लेट डिंकाच्या मदतीने एकमेकांना जोडून एक सुंदर फीडर तयार करा. कपमध्ये पाणी भरा आणि प्लेटचा वापर बेससारखा करा. तुम्ही हे कुठेही टांगू शकता. हे पण वाचा- बागेसाठी चिनी मातीच्या कुंड्यांचे ट्रेंडी डिझाइन्स, बाल्कनीसाठी निवडा क्लासी पीस
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories