चेहरा नैसर्गिकरित्या उजळ आणि तजेलदार ठेवण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय नियमितपणे केल्यास चेहरा उजळ दिसू शकतो.
Dry Skin Care at Home : प्रत्येकाला मऊ आणि चमकणारी त्वचा हवी आहे. पण प्रत्येकाचा त्वचेचा प्रकार समान नसतो. काहींची त्वचा संवेदनशील असते तर इतरांची कोरडी त्वचा असते. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. त्वचेमध्ये कमी प्रमाणात नैसर्गिक तेलामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते. कोरडेपणाच्या इतर कारणांमध्ये प्रदूषण, तणाव आणि बदल यांचा समावेश असू शकतो. अशातच घरच्याघरी महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स किंवा प्रोडक्ट्सएवजी त्वचेची कशी काळजी घेऊ शकता हे जाणून घेऊया.
तूप
तूपाचा वापर आपण गोड पदार्थ करण्यासाठी किंवा वरण भातावर वरुन घेऊन खाण्यासाठीच करतो मात्र तूपात अनेक औषधी गुण पण आहेत किंवा तूपामुळे अनेक आजार कमी होऊ शकते हे अनेकांना माहितच नसतं. रात्री त्वचेला किंवा ओठाला तूप लावून झोपल्यास त्वचा कोरडी होत नाही आणि नितळ राहण्यास मदत होते.
खोबऱ्याचे तेल
रात्री खोबऱ्याचे तेल हातापायाला लावून झोपावे त्याने रात्रभार शरीराला तेल मुरतं आणि त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. धुळीतून घरी आले असाल आणि चेहरा काळा पडला असेल तर चेहऱ्यावर तेल घासावं आणि मग कापसानं पुसून काढावा याने चेहरा डॅमेज होत नाही आणि त्वचा नितळ राहण्यास मदत होते.
लोणी
हिवाळ्यात ओठं फाटण्याची समस्या सगळ्यांना असते. अनेक लोक वेगवेगळे लिप केअर्स वापरतात. त्यामुळे रात्री झोपताना घरात लोणी असेल तर ओठाला लावून झोपल्यास ओठ नरम राहतात आणि ओठाचा रंग उजळतो.
ग्लिसरीन आणि गुलाब पाणी
ग्लिसरीन 100 मिली आणि त्याच्या दुप्पट म्हणजेच 200-250 मिली गुलाब पाणी एका बॉटल मध्ये एकत्र करुन ठेवा. आंघोळीनंतर किंवा रात्री झोपण्याच्या वेळी हात पाय धूवून लावा. त्वचा कोरडी पडणार नाही.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे ही पांढरी वस्तू, डाएटमध्ये करा समावेश