Eye Care : दीर्घकाळ मोबाइल पाहिल्याने डोळे होऊ शकतात कोरडे, वेळीच ही सवय थांबवा

Published : Jun 19, 2026, 02:50 PM IST

सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. काहीजण तर स्मार्टफोनवर अर्धा दिवस व्यस्त असतात. पण ही सवय तुमच्या डोळ्यांवर ताण पाडू शकते. अशातच डोळे कोरडे होण्याची समस्या उद्भवू शकते.

PREV
14
स्क्रिन टाइममुळे डोळ्यांच्या समस्या

स्मार्टफोन आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. बहुतांशजण ऑफिसचे काम, मुव्ही पाहणे किंवा सोशल मीडियावर खूप वेळ घालवतात. पण दीर्घकाळ मोबाइल किंवा लॅपटॉपच्या स्क्रिनचा वापर केल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो. याशिवाय डोळ्यांची उघडझाप कमी होऊ शकते. यामुळे डोळ्यांमधील नॅच्युरल ओसरलपणा कमी होऊ लागतो. अशातच डोळे कोरडे होणे, खाज येणे किंवा डोळ्यांची जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात.

24
मुख्य कारण काय?

सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या एका मिनिटांमध्ये 15-20 वेळा पापण्यांची उघडझाप होते. पण मोबाइलचा वापर करताना डोळ्यांची उघडझाप कमी होते. अशातच डोळ्यांमध्ये थोड्यावेळाने कोरडेपणा जाणवू लागते. याशिवाय सतत स्क्रिनकडे पाहत राहिल्याने धूरकट दिसणे, डोळे दुखणे किंवा डोकेदुखी अशा समस्या वाढल्या जाऊ शकतात. सध्या ही समस्या लहान मुलांमध्येही जास्त पाहायला मिळतेय.

34
बदला या सवयी

डोळ्यांच्या आरोग्यासाठी 20-20-20 चा नियम पाळू शकता. यामध्ये प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट अंतरावरील वस्तूकडे पाहावे. याशिवाय मोबाइल आणि लॅपटॉपवर काम करताना डोळ्यांपासून थोड्या अंतरावर ठेवावा. तसेच स्क्रिनची ब्राइटनेस योग्य ठेवावी. अंधारात दीर्घकाळ मोबाइल वापरणे टाळा. हेल्दी डोळ्यांसाठी पुरेशी झोप घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि डोळ्यांचा व्यायाम करावा.

44
त्रास वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक

डोळ्यांची जळजळ, सतत पाणी येणे, धूसर दिसणे अशा समस्या उद्भवत असतील तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जेणेकरुन डोळ्यांचे आरोग्य राखले जाईल.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories