
Drinking water in morning benefits : दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अशातच लोकांना सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, जो आरोग्यासाठी फायदेशीर आहे, अशातच अशा प्रश्न उपस्थितीत होतो की, सकाळच्या वेळेस पाणी का प्यावे? याबद्दलच आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात हे जाणून घेऊया.
सकाळी पाणी का प्यावे?
आरोग्य तज्ज्ञांनुसार, 8-9 तासांची पुरेशी झोप घेतल्यानंतर सकाळी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि शरीराला उर्जा मिळते. अशातच सकाळपासूनच संपूर्ण दिवससाठी शरीराला हाइड्रेट ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
पाणी पिण्याचे फायदे
शरीर डिटॉक्स होते
सकाळी उठून पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे रक्त शुद्ध देखील होते. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो.
वजन कमी होते
सकाळी उठून कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यासह कॅलरीज बर्न होतात. पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते आणि ओव्हरइटिंगपासून दूर राहता.
शरीराला उर्जा मिळते
सकाळच्या वेळेस पाणी प्यायल्याने शरीर हाइड्रेट राहण्यासह उर्जा मिळते. यामुळे कामावर लक्ष केंद्रित राहते.
त्वचेसाठी फायदेशीर
सकाळी उठून पाणी प्यायल्याने शौच आणि लघवीच्या माध्यमातून टॉक्सिन्स बाहेक पडतात. यामुळे रक्त शुद्ध होते. अशातच त्वचेमध्ये ओलसरपणा टिकून राहते आणि त्वचा स्वच्छ होते. यामुळे त्वचेला नॅच्युरल ग्लो आणि हेल्दी राहण्यास मदत होते.
हाइड्रेट राहता
रात्रभर झोपून उठल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागते. अशातच शरीराला पाण्याची गरज भासते. जेणेकरुन सर्व कार्ये व्यवस्थितीत होतील. यामुळे सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्यास हाइड्रेट राहण्यास मदत होते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)