गुळाचा चहा हिवाळ्यात शरीराला गरमी देण्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. गुळातील लोह, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात, रक्तप्रवाह सुधारतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात.
हिवाळ्यात गुळाचा चहा पिल्याने शरीराला गरमी तर मिळतेच शिवाय हा चहा त्वचेसाठी देखील उपयुक्त ठरू शकतो. गुळात लोह, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सीडंट असतात, ज्यामुळे त्वचेला पोषण मिळते. हा चहा पिल्याने रक्त प्रवाह चांगला होतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते. तसेच त्वचेवरील डाग देखील कमी होऊ शकतात.जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर गुळाचा चहा पिण्याआधी पॅच टेस्ट करणे चांगले आहे.जेणे करून कोणतीही अॅलर्जी टाळता येईल.
गुळात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडंट्स त्वचेवरील डाग कमी करतात. गुळ हार्मोनचे असंतुलन नियंत्रित करण्यास मदत करतो. ज्यामुळे त्वचेवर मुरूम आणि पिगमेंटेशनची समस्या कमी होते. तसेच, गुळ शरीराला डिटॉक्स करते, ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि तजेलदार राहते.
गुळात भरपूर लोह असते, जे रक्त बनवण्यास मदत करते आणि अॅनिमियाची समस्या दूर करते. व्हिटॅमिन सी त्वचेला उजळण्यास आणि कोलेजन प्रोडक्शनसाठी मदत करते. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी दिसते. हाडे आणि दातांसाठी उपयुक्त कॅल्शिअम देखील गुळात आढळते. त्यामुळे ज्यांचे दात कमजोर आहेत ते देखील गुळाचा चहा पिऊ शकतात. यात असलेले मॅग्नेशिअम मांसपेशींसाठी उपयुक्त असते आणि शरीराला ऊर्जादायी ठेवते. तसेच गुळात असलेले फॉस्फरस हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते आणि शरीराची ऊर्जा पातळी समतोल ठेवण्यास मदत करते. गुळ रक्त दाबाला नियंत्रित करण्यास मदत करतो आणि शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवते. त्वचेसाठी झिंक देखील खुप आवश्यक असते जे मुरूम आणि अन्य त्वचारोगांना दूर करण्यात मदत करते.
सूचना : वरील लेख केवळ माहिती साठी आहे. अधिक माहितीसाठी तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एशिया नेट न्युज वरील माहितीसाठी जबाबदारीचा दावा करत नाही
हेही वाचा: