शर्टच्या डाव्या खिशात मोबाईल ठेवणं ही अनेकांची रोजची सवय असते. पण फोन हृदयाच्या इतक्या जवळ असल्यामुळे हृदयाच्या ठोक्यांवर काही परिणाम होतो का? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग, यामागचं नेमकं सत्य काय आहे ते जाणून घेऊया.
मोबाईलशिवाय आता एक दिवसही काढणं कठीण झालंय. कॉल, मेसेजपासून ते पैशांच्या व्यवहारापर्यंत प्रत्येक गोष्टीत फोन आपला साथीदार असतो. अनेक जण शर्टच्या डाव्या खिशात, अगदी हृदयाजवळ मोबाईल ठेवतात. इथूनच प्रश्न निर्माण होतो की, मोबाईलच्या रेडिएशनमुळे हृदयाचं नुकसान होतं का? सध्याच्या विज्ञानानुसार, निरोगी माणसांच्या बाबतीत मोबाईलच्या रेडिओ लहरींमुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये समस्या निर्माण होते, असा कोणताही भक्कम पुरावा मिळालेला नाही.
26
हार्टबीट बदलले जातात?
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (FDA) स्पष्ट केलंय की, सेलफोनच्या रेडिएशनचा आणि सामान्य शारीरिक समस्यांचा कोणताही थेट संबंध शास्त्रज्ञांना आढळलेला नाही. मोबाईलच्या रेडिओ लहरी एक्स-रे सारख्या नसतात, ज्या शरीरात घुसून थेट पेशींचा डीएनए नष्ट करतील. त्यामुळे फक्त डाव्या खिशात फोन ठेवल्याने अचानक तुमचे हार्टबीट बदलतील, असं अजिबात म्हणता येणार नाही.
36
काय करावं?
फोन जेव्हा व्हायब्रेट होतो, तेव्हा छातीजवळ आपल्याला ते थेट जाणवतं. जे लोक आपल्या हार्टबीटबद्दल थोडे जास्त विचार करतात, ते अनेकदा या व्हायब्रेशनलाच हार्टबीटमधील बदल समजण्याची चूक करतात. पण फोनचं व्हायब्रेशन जाणवणं म्हणजे हार्टबीट असामान्य झालेत, असं अजिबात नाही. जर तुमचे हार्टबीट खरोखरच खूप वेगवान किंवा अनियमित असतील, तर फोनला दोष न देता थेट डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
पण ज्यांच्या हृदयात पेसमेकर किंवा इतर कोणतंही यंत्र बसवलं आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट थोडी वेगळी आहे. पेसमेकर किंवा हार्टबीट नियंत्रित करणारं यंत्र ज्यांच्याकडे आहे, त्यांनी मोबाईल फोन खूप जवळ ठेवणं टाळलं पाहिजे. आजकालच्या आधुनिक स्मार्टफोन आणि त्याच्या ॲक्सेसरीजमध्ये बऱ्यापैकी शक्तिशाली चुंबक असतं. हे चुंबक हृदयात बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या कामात तात्पुरता अडथळा निर्माण करू शकतं. सामान्य लोकांसाठी यात घाबरण्यासारखं काही नाही, पण ज्यांच्या हृदयात यंत्र बसवलंय, त्यांच्यासाठी हा एक इशारा आहे.
56
अशी घ्या काळजी
ज्यांच्या छातीत पेसमेकर किंवा आयसीडी (ICD) सारखं यंत्र बसवलं आहे, त्यांनी त्या यंत्राच्या बरोबर वरच्या शर्टच्या खिशात मोबाईल ठेवू नये. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (FDA) असा सल्ला दिलाय की, मोबाईल फोन आणि हृदयात बसवलेलं यंत्र यांच्यात किमान १५ सेंटीमीटर किंवा ६ इंचांचं अंतर ठेवणं आवश्यक आहे.
66
ही गोष्ट ठेवा लक्षात
ज्या बाजूला यंत्र बसवलं आहे, त्याच्या विरुद्ध बाजूच्या कानाला फोन लावून बोलल्यास हे अंतर राखणं सोपं जातं. विशेषतः चुंबक असलेले फोनचे कव्हर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा हृदयाच्या यंत्रापासून दूर ठेवणं खूप गरजेचं आहे.