तूर डाळ आणि मसूर डाळ दिसायला जवळपास सारख्याच असतात, फक्त त्यांचा रंग वेगळा असतो. तूर डाळ तुरीपासून बनते, पण मसूर डाळ नक्की कशापासून तयार होते? जाणून घ्या.
आपल्या स्वयंपाकघरात अनेक प्रकारच्या डाळी असतात. आपण रोजच्या जेवणात तूर डाळीचा सर्वात जास्त वापर करतो. वरण किंवा सांबार बनवायचा असेल, तर तूर डाळ लागतेच. पण बाजारात आपल्याला दोन प्रकारच्या डाळी दिसतात. एक पिवळ्या रंगाची तूर डाळ आणि दुसरी केशरी रंगाची मसूर डाळ. या दोन्हीमध्ये नक्की काय फरक आहे? कोणती डाळ आरोग्यासाठी जास्त चांगली आहे? चला पाहूया.
23
तूर डाळ...
आपण रोजच्या जेवणात हीच तूर डाळ वापरतो. हिला इंग्रजीत 'स्प्लिट पिजन पी' (Split Pigeon pea) असंही म्हणतात. ही डाळ पिवळ्या किंवा हलक्या क्रीम रंगाची असते. तूर डाळीमध्ये प्रोटीन, फायबर, फोलेट आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. १०० ग्रॅम तूर डाळीतून आपल्याला साधारण २१ ते २२ ग्रॅम प्रोटीन मिळते. शेतात पिकणाऱ्या तुरीच्या शेंगांपासून ही डाळ तयार केली जाते.
33
मसूर डाळ...
बाजारात मिळणारी दुसरी डाळ म्हणजे मसूर डाळ. ही डाळ लाल किंवा केशरी रंगाची असते. तूर डाळीच्या तुलनेत मसूर डाळ खूप लवकर शिजते. तुम्हाला घाई असेल, तर ही डाळ उत्तम पर्याय आहे. 'लेन्स क्युलारिस' (Lens culinaris) या शास्त्रीय नावाच्या रोपापासून मसूर डाळ मिळते. या रोपाच्या शेंगांमध्ये भिंगाच्या (lens) आकाराचे दाणे असतात. त्यांची साल काढल्यावर आतून केशरी रंगाची डाळ मिळते.
कोणत्या डाळीत जास्त पोषण असते?
दोन्ही डाळींमध्ये प्लांट-बेस्ड प्रोटीन, फायबर आणि खनिजे भरपूर असतात. पण तूर डाळीपेक्षा मसूर डाळीत प्रोटीन आणि आयर्न थोडे जास्त असते. तर तूर डाळीत पोटॅशियम आणि फोलेट जास्त असते. आरोग्यासाठी दोन्ही डाळी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे या डाळी वेगवेगळ्या खाण्यापेक्षा एकत्र करून खाल्ल्यास शरीराला जास्त फायदा मिळतो.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.