Do and Don'ts On Surya Grahan 2024 : सूर्यग्रहणावेळी काय करावे आणि काय करू नये?

Published : Sep 28, 2024, 01:34 PM IST
1st solar eclipse of 2020

सार

Do and Don'ts On Surya Grahan 2024 : वर्ष 2024 मधील अंतिम सूर्यग्रहण 2 ऑक्टोंबरला असणार आहे. यावेळी काही विशेष रुपात काही गोष्टींची काळजी घ्यावी. जाणून घेऊया सूर्यग्रहणात काय करावे आणि काय नाही याबद्दल सविस्तर..

Do and Don'ts On Solar Eclipse 2024 : येत्या 2 ऑक्टोंबर, बुधवारी वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण असणार आहे. वैज्ञानिकांनुसार, यंदाचे सूर्यग्रहण रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी सुरु होणार असून मध्यरात्री 03 वाजून 17 मिनिटांपर्यंत राहणार आहे. ऑक्टोंबर महिन्यातील सूर्यग्रहण दक्षिम प्रशांत महासागर, अर्जेंटिना, दक्षिण अटलांटिक महासागरसारख्या देशात दिसणार आहे. पण भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. यामुळे भारतात सूतककाळ नसणार आहे. ज्या देशांमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे तेथेच सूतककाळ असणार आहे. हिंदू मान्यतेनुसार, ग्रहणावेळी काही खास कामे करणे टाळावेत. जाणून घेऊया सूर्यग्रहणासाठी काय करावे आणि काय नाही याबद्दल सविस्तर....

सूर्यग्रहणात कोणती 6 कामे चुकूनही करू नये?

  • विद्वानांनुसार, सूर्यग्रहणावेळी पूजा-प्रार्थना करू नये. शक्य असल्यास घरातील देव्हारा पडद्याने झाकून ठेवावा.
  • सूर्यग्रहणावेळी काहीच खाऊ नये. घरातील जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला किंवा मुलं खाऊ शकतात.
  • सूर्यग्रहणावेळी झोपू नये आणि घराबाहेरही जाऊ नये. अशा स्थितीत घरीच राहणे उत्तम मानले जाते.
  • ग्रहणावेळी संभोगक्रिया करू नये. यामुळे आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
  • गर्भवती महिलांनी ग्रहणावेळी घराबाहेर पडू नये. याशिवाय धारधार चाकू, कैचीसारख्या वस्तूंचा वापरही टाळावा.
  • ग्रहण कधीच उघड्या डोळ्यांनी पाहू नये. यामुळे डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात.

सूर्यग्रहणावेळी काय करावे...

  • विद्वानांनुसार, सूर्यग्रहणावेळी मनातल्या मनात मंत्रांचा जप करावा. यावेळी ईष्ट किंवा सूर्यदेवासंबंधित मंत्रांचा जप करावा.
  • ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहण असल्यास त्यांनी राहू-केतूसंबंधित मंत्रांचा जप करावा. यामुळे ग्रहणातील अशुभ फळापासून दूर राहता येईल.
  • सूर्यग्रहणावेळी धर्म ग्रंथ जसे की, श्रीमद्भवतगीता वाचू शकता.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

आणखी वाचा :

Ring Of Fire म्हणजे काय? सूर्यग्रहणावेळीच का दिसते घ्या जाणून

ही 4 कामे चुकूनही एकट्यात करू नका, भोगाल वाईट परिणाम

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!