महाभारतानुसार, महात्मा विदुर यमराजचे अवतार होते. त्यांनी आपल्या नीतिमध्ये कोणती 4 कामे एकट्याने करू नयेत हे सांगितले आहे. याबद्दल जाणून घेऊया पुढे...
एक स्वादु भुंजीत एकाश्चर्थान चिन्तयेत् । एको न गच्छेदध्वानं नैक: सुप्तेषु जागृयात् ।।
एकट्याने स्वादिष्ट भोजन, एकट्याने कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेऊ नये. एकट्याने कोणत्याही मार्गावर जाऊ नये आणि ज्यावेळी सर्वजण झोपले असतील तेव्हा एकट्याने जागू नये.
तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती झोपल्या असतील तर तुम्हीही झोपावे. एकट्याने कधीच रात्री जागू नये. याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
ग्रंथामध्ये एकट्याने भोजन करणाऱ्याला पापी म्हटले आहे. एकांतात भोजन करताना आपल्या आजूबाजूला भूकलेला व्यक्ती नाही ना याकडे पहावे.
विदुर नीतिनुसार, अज्ञात मार्गाने कधीच एकट्याने जाऊ नये. यामुळे जीवाला धोका उद्भवू शकतो. तुमच्या एकटेपणाचा काहीजण फायदा घेऊ शकतात.
विदुर नितीनुसार, कोणत्याही प्रकरणात एकट्याने निर्णय घेऊ नये. यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. यावेळी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.