Bhaubeej Wishes 2023: भाऊबीजेला पाठवा या खास शुभेच्छा, भाऊबहिणीचे नाते होईल अधिक मजबूत

Bhaubeej Wishes 2023 In Marathi : भाऊबहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. या महत्त्वपूर्ण सणानिमित्त आपल्या ताईदादाला मराठी भाषेतील हे संदेश पाठवून सणाच्या खास पद्धतीने शुभेच्छा द्या.

 

Harshada Shirsekar | Published : Nov 13, 2023 12:26 PM IST / Updated: Nov 15 2023, 09:52 AM IST
111

Bhaubeej Wishes 2023 In Marathi : देशभरात दीपोत्सव (Diwali 2023) जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करून भगवान कुबेर-महालक्ष्मीपूजन केल्यानंतर आता सर्वत्र भाऊबीज सण दणक्यात साजरी करण्याची तयारी सुरू आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष द्वितिया तिथिला ‘भाऊबीज’  (Bhaubeej 2023) सण साजरा केला जातो. 

रक्षाबंधन (Rakshabandhan 2023) सणाप्रमाणेच भाऊबीजही बहीण-भावाच्या अतूट व पवित्र नात्याचा सण आहे. काही ठिकाणी हा सण ‘यमद्वितीया’ या नावाही ओळखला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊबहिणीचे हे मायेचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या दादा-ताईला हे खास शुभेच्छा (Bhaubeej Wishes In Marathi) संदेशही नक्की पाठवा.

211

भाऊ-बहिणीचे मजबूत नाते

नको त्यास महागड्या भेटवस्तू

हे नाते कायम राहो अतूट

मिळो माझ्या भावाला आनंद अफाट

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Bhaubeej 2023

311

प्रेम व विश्वासाच्या नात्याचा सण करा साजरा

तुमचे प्रत्येक मागणे देव करो पूर्ण

भाऊबीजेचा आहे पवित्र सण

प्रेमाच्या वर्षावाने उजळो आंगण

भाऊबीज सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

411

बहिणीचे भावांवर असतात हजारो शुभार्शीवाद

भाऊ-बहिणीचे अनमोल नाते

देवाची कृपादृष्टी या अतूट नात्यावर राहो सदैव

भाऊबीज सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

511

बालपणीच्या आठवणी आजही आहेत लक्षात

भांडण, फुगणे-रूसणे व पुन्हा मनधरणीचे खेळ सारे

हेच तर आहे भाऊ-बहिणीचे प्रेम खरे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

611

चंदनाचा टिळा, औक्षणाचे ताट

भावाची आशा, बहिणीची वेडी माया

आनंदाने साजरा करा नात्याचा हा सुंदर सण

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

711

भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ

या नात्याला न लागो कोणाचीही नजर

दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

811

भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन

माया व विश्वासाचे बंधन

तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा

दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना

Happy Bhaubeej 2023

911

आरतीची थाळी सजवते

कुंकू-अक्षतेचा टिळा तुझ्या माथी लावते

तुझ्या उज्ज्वल दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते

कोणतेही संकट तुझ्यावर न येवो असे देवाकडे मागणे मागते

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !

1011

भाऊबीजेचा सण नक्कीच आहे खास

आपल्या पवित्र नात्यात असाच कायम राहू दे गोडवा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

1111
Share this Photo Gallery