दिवाळी पूजेनंतर लक्ष्मीदेवीची प्रतिमा कुठे ठेवावी? लक्षात ठेवा 5 गोष्टी
दिवाळीमध्ये महालक्ष्मी मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी देवीच्या प्रतिमेची तर काही जण मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची पूजा करतात.
पूजेनंतर लक्ष्मीमातेची प्रतिमा कुठे ठेवावी? याबद्दल खूप कमी जणांना माहीत आहे. यामुळेच कळत-नकळत काही लोक कित्येक चुका करतात, ज्या टाळणे गरजेचे आहे.
लक्ष्मीपूजनानंतर देवीमातेची प्रतिमा कुठे ठेवावी? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती...
पूजा केल्यानंतर लक्ष्मीमातेच्या प्रतिमेजवळ तुपाचा दिवा रात्रभर तेवत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर नैवेद्य दाखवा व विसर्जन मंत्र बोलून मूर्ती थोडीशी हलवावी.
पूजेनंतर लक्ष्मीमातेची प्रतिमा अस्वच्छ ठिकाणी ठेवण्याची चूक करू नका. यामुळे दोष लागून आपल्या जीवनात कित्येक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
देवीच्या प्रतिमेपासून लहान मुलांना दूर ठेवा. कारण लहान मुलांना कळत नसल्याने चुकून त्यांच्याकडून प्रतिमा भंग होऊ शकते. अपशकुन टाळण्यासाठी देवीच्या प्रतिमेची विशेष काळजी घ्या.
पूजा केल्यानंतर लक्ष्मीदेवीची प्रतिमा जास्त वेळ घरात ठेवू नका. लवकरात लवकर देवीच्या प्रतिमेचे विसर्जन करावे. यामुळे शुभ फळ मिळतील.
‘हे देवीमाते तुमची कृपादृष्टी आमच्यावर कायम ठेवा, घरात धनधान्याची कमतरता होऊ देऊ नका’ लक्ष्मीमातेच्या प्रतिमेचे विसर्जन करताना अशी प्रार्थना केल्यास जीवनात सुख-समृद्धी टिकून राहील.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.