Dhanteras 2025 : धनत्रयोदशी का साजरी करतात? जाणून घ्या तारीख, धार्मिक महत्वासह कथा

Published : Oct 08, 2025, 02:35 PM IST

Dhanteras 2025 : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, समृद्धी व प्रकाशाचा उत्सव. या पाच दिवसाच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. जाणून घ्या धनत्रयोदशीचे धार्मिक महत्व आणि कथा.

PREV
15
धनत्रयोदशी 2025

दिवाळीचा उत्सव म्हणजे आनंद, प्रकाश आणि समृद्धीचा पर्व. या पंचदिवसी सणाची सुरुवात धनत्रयोदशी या पवित्र दिवसापासून होते. “धन” म्हणजे संपत्ती आणि “त्रयोदशी” म्हणजे तेरावी तिथी. हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी आरोग्य, आयुष्य आणि धन यांचे पूजन करून दिवाळीच्या मंगल प्रारंभाची नांदी होते. यंदा धनत्रोदशी येत्या 18 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. 

25
धनत्रयोदशीचा इतिहास आणि पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनावेळी भगवान विष्णूंच्या अवतारात धन्वंतरी अमृतकलश आणि औषधींचा ग्रंथ घेऊन प्रकट झाले. या कारणाने धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक आणि आरोग्यदेव मानले जाते. म्हणूनच या दिवशी धन्वंतरी भगवानाची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी या दिवशी आयुर्वेदिक औषधोपचार सुरू करणे, नवे औषधालय उघडणे किंवा वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते.

35
धन्वंतरी पूजन आणि आरोग्याची कामना

धनत्रयोदशीच्या दिवशी लोक भगवान धन्वंतरीचे पूजन करून आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धीची कामना करतात. पूजा करताना कलश, तांदूळ, फुले, हळद, कुंकू आणि तूपाचा दिवा वापरला जातो. "ॐ नमो भगवते धन्वंतरये अमृतकलश हस्ताय" या मंत्राने धन्वंतरीचे आवाहन केले जाते. आजच्या काळातही आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा सण आहे, जो शरीर आणि मन दोन्हीच्या शुद्धतेचा संदेश देतो.

45
यमदीपदानाची परंपरा

धनत्रयोदशीच्या संध्याकाळी “यमदीपदान” करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला एक छोटा दीप लावला जातो. हा दीप मृत्यूदेव यमाला अर्पण केला जातो, ज्यामुळे अकालमृत्यू टळतो अशी श्रद्धा आहे. यमदीपदान म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर प्रकाश आणि आयुष्याचा सन्मान करण्याची सुंदर परंपरा आहे.

55
धनत्रयोदशी आणि खरेदीचे महत्त्व

या दिवशी सुवर्ण, चांदी, धान्य किंवा भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे. कारण, या दिवशी खरेदी केलेली वस्तू घरात लक्ष्मीचे आगमन घडवते असा समज आहे. व्यापारी वर्गासाठीही हा दिवस अत्यंत शुभ असतो — कारण नवीन खात्यांची सुरुवात याच दिवशी केली जाते. त्यामुळे धनत्रयोदशी हा दिवस आरोग्याबरोबरच आर्थिक समृद्धीचेही प्रतीक ठरतो.

Read more Photos on

Recommended Stories