Dhanteras 2024 निमित्त मित्रपरिवाराला मराठमोळे संदेश पाठवून साजरा करा सण

Dhanteras 2024 : येत्या 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी भगवान धन्वंतरी, यमराज आणि कुबेरची पूजा केली जाते. याशिवाय सोनं-चांदीची खरेदी करणेही शुभ मानले जाते. यंदाच्या धनतेरसच्या मराठमोठ्या शुभेच्छा पाठवून साजरा करा सण…

Dhanteras 2024 Wishes in Marathi : अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. येत्या 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी यांनी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. यामुळेच धनत्रयोदशीला खास महत्व आहे. यंदाच्या धनत्रयोदशीनिमित्त मित्रपरिवाराला काही खास मेसेज, शुभेच्छापत्र, WhatsApp Status, Facebook Post, HD Images शेअर करुन साजरा करा सण.

फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरे करू
आली रे आली दिवाळी आली
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

पहिला दिवा आज लागेल दारी,
सुखाचा किरण येईल तुमच्या घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
तुम्हाला धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा

दिवाळी आली सोनपावली,
उधळण झाली सौख्याची,
धनधान्यांच्या भरल्या राशी
घरी नांदू दे सुख समृद्धी…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं सत्सम्वत्सरं
दीर्घ मायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा : 

Dhanteras 2024 : सोन्याएवजी खरेदी करा या वस्तू, देवी लक्ष्मी होईल खूश

दिवाळीत फटाक्यांच्या धुरात घराबाहेर पडताना या 5 गोष्टींची घ्या काळजी

Read more Articles on
Share this article