येत्या 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. यंदाच्या धनत्रयोदशीला सोनं-चांदीएवजी पुढील वस्तू खरेदी करू शकता.
घरात देवी लक्ष्मीचा वास असावा यासाठी धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि गणपतीची मुर्ती खरेदी करू शकता. यांमुळे घरात धनधान्य प्राप्ती होईल.
धनत्रयोदशीला सोन्याच्या किंमती वाढलेल्या असतात. अशातच चांदी, प्लॅटिनम अथवा अन्य धातूपासून तयार केलेल्या ज्वेलरी खरेदी करू शकता.
धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याचे धार्मिक महत्व आहे. असे मानले जाते की, यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होऊन देवी लक्ष्मीचा वास घरात राहतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. य दिवशी चांदी, तांबे, पितळ अथवा स्टीलची भांडी खरेदी करू शकता. याला सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
धनत्रयोदशीला एखादे नवे इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी करणे शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही नव्या तांत्रिक आणि उन्नतीच्या मार्गाने चालत आहात.