धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरींची पूजा करण्याचे खास महत्व, घ्या जाणून

धनत्रयोदशीच्या दिवळी धनाची देवी लक्ष्मी, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि कुबेर देवतेची पूजा केल्याने धन-संपत्तीत वाढ होते.

Chanda Mandavkar | Published : Oct 23, 2024 2:58 AM IST / Updated: Oct 23 2024, 08:31 AM IST

Dhanteras 2024 : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा दिवाळीचा सण येत्या 1 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. अशातच प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी म्हणजेच कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीवेळी धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीच्या सणापासून दिपोत्सवाला सुरुवात होते. या दिवशी खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. धनत्रयोदशीला सोनं-चांदी, पितळेच्या किंवा तांब्याची भांडी खरेदी करतात. याशिवाय देवी लक्ष्मी, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांची देखील पूजा केली जाते.

धनत्रयोदशीचा उत्साह आणि महत्व
प्रत्येक वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठा उत्साह नागरिकांमध्ये दिसून येतो. या दिवशी सोनं-चांदी ते झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि कुबेर देवतेची पूजा केल्याने धन-संपत्तीत वाढ होते. याशिवाय भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्य प्राप्त होते. जाणून घेऊया भगवान धन्वंतरी कोण आहेत आणि धनत्रयोदशीला त्यांची पूजा का केली जाते याबद्दल अधिक...

भगवान धन्वंतरींची पूजा
पौराणिक मान्यतेनुसार, अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले होते. यावेळी एक-एक करुन समुद्र मंथनातून 14 रत्न प्राप्त झाले होते. समुद्र मंथननंतर सर्वाधिक अखेरीस अमृत मिळाले. पौराणिक कथेनुसार, यानंतर भगवान धन्वंतरी समुद्रातून हातात अमृत घेऊन प्रकट झाले होते. हा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी होती. अशातच धनत्रयोदशी किंवा धनतेरसच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते.

धनत्रयोदशीला खरेदी करण्याचे महत्व
ज्यावेळी भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताचा कलश होता. हेच कारण आहे की, धनत्रयोदशीला भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी खरेदी केलेल्या भांड्यामध्ये दिवाळीनंतर अन्नपदार्थ तयार केले जातात. असे केल्याने धन आणि अन्नात नेहमीच वाढ होते असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीला खरेदी केलेली वस्तू 13 पट अधिक लाभ देते. यामुळेच धनत्रयोदशीला बहुतांशजण पितळ, तांब्यांच्या भांड्यांसह सोनं-चांदीची भांडीही खरेदी करतात.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

प्रत्येक वर्षी दिवाळीला पूजेसाठी नवी मुर्ती खरेदी करावी? वाचा काय आहे मान्यता

Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशी साजरी करण्यामागील वाचा पौराणिक कथा

Read more Articles on
Share this article