Horoscope 3rd March : आज चंद्रग्रहण, कुणाला धनलाभ तर कोण अडकणार संकटात? वाचा आजचे १२ राशींचे राशीभविष्य

Published : Mar 03, 2026, 07:30 AM IST

3 मार्च, मंगळवारी 2026 सालातलं पहिलं चंद्रग्रहण आहे. याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल. काहींसाठी हा दिवस शुभ असेल, तर काहींसाठी अशुभ. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस…

PREV
113
३ मार्च २०२६ चे राशीभविष्य

3 मार्च 2026 रोजी मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, नोकरीत त्यांच्या कामाचे कौतुक होईल. वृषभ राशीच्या लोकांना संतान सुख मिळेल, दिवस संमिश्र राहील. मिथुन राशीच्या लोकांच्या आईची तब्येत बिघडू शकते, शेअर बाजारातून लाभ होईल. कर्क राशीच्या लोकांना धनलाभ होईल, विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. पुढे जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कसा राहील दिवस?

213
मेष राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Mesh Rashifal)

प्रेमींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमच्या कामाची प्रशंसा होईल. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. व्यापाऱ्यांसाठी लाभाची वेळ आहे. नवीन कामाच्या सुरुवातीमुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आरोग्याची काळजी घ्या.

313
वृषभ राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Vrishbha Rashifal)

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. कोणतेही काम विचारपूर्वक करा. लव्ह लाईफसाठी हा काळ चांगला नाही. जुन्या मित्रांकडून एखादी खास भेट मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रात तुम्ही खूप मेहनत कराल. संतान सुख मिळेल.

413
मिथुन राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Mithun Rashifal)

आईच्या आरोग्याबद्दल चिंता वाटेल. शेअर खरेदी-विक्रीसाठी वेळ चांगला आहे, घर-जमीन किंवा गाडीतही गुंतवणूक करू शकता. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन होऊ शकतो. नोकरदार लोकांसाठी वेळ अनुकूल आहे. दिवस ठीकठाक जाईल.

513
कर्क राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Kark Rashifal)

करिअरच्या दृष्टीने दिवस फारसा खास नसेल. आज घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. लव्ह लाईफसाठी हा काळ थोडा संमिश्र राहील. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला आहे. धनलाभाची शक्यता आहे.

613
सिंह राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Singh Rashifal)

या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचे म्हणजेच प्रमोशनचे योग आहेत. भागीदारीच्या व्यवसायात हात घालू नका. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. मुलांच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता राहील. मेहनत करूनही महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात.

713
कन्या राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Kanya Rashifal)

मुलांच्या अपयशामुळे निराशा येऊ शकते. कुटुंबात तणाव असेल, मानसिक अशांती राहील. विनाकारण होणारे वाद टाळा. अविवाहित लोकांना लग्नासाठी स्थळं येतील. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

813
तूळ राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Tula Rashifal)

नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला नाही. पोटदुखी होऊ शकते, त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. शेअर मार्केटवाल्यांना फायदा होईल पण गुंतवणूक विचारपूर्वक करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात येऊ नका, उगाच मनस्ताप होऊ शकतो.

913
वृश्चिक राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Vrishchik Rashifal)

प्रेम संबंधांसाठी वेळ ठीक नाही. करिअरबाबत जागरूक राहा. लग्नासंबंधी सुरू असलेल्या चर्चांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. कुटुंबातील मालमत्तेचा वाद मिटू शकतो. निकाल तुमच्या बाजूने लागतील. सर्वांचे सहकार्य मिळेल.

1013
धनु राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Dhanu Rashifal)

जोडीदारासोबत उत्तम संबंध राहतील. प्रेमींसाठी हा काळ चांगला आहे. नोकरदार लोकांसाठी वेळ उत्तम आहे. वायफळ खर्च करणे टाळा. आर्थिक बाबतीत जास्त संघर्ष करावा लागेल. प्रेम संबंधाचे रूपांतर लग्नात होऊ शकते, प्रयत्न करत राहा.

1113
मकर राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Makar Rashifal)

व्यापाऱ्यांसाठी लाभाची स्थिती निर्माण होईल. व्यवसायासाठी प्रवासाला जाण्याचे योग आहेत. जमिनीशी संबंधित एखादा वाद मिटू शकतो. मानसिक तणावातून सुटका मिळेल. कोणीतरी जवळची व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. कोणालाही पैसे उधार देऊ नका.

1213
कुंभ राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Kumbh Rashifal)

शिक्षणातील अडथळे दूर होतील, निकाल तुमच्या बाजूने लागतील. एखादे मोठे यश हाती लागू शकते. वडिलांच्या आरोग्याबद्दल चिंता राहील. पती-पत्नीमधील नातं अधिक घट्ट होईल. व्यापाऱ्यांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस खूप श्रेष्ठ आहे.

1313
मीन राशीभविष्य ३ मार्च २०२६ (Dainik Meen Rashifal)

विद्यार्थ्यांसाठी हा दिवस मध्यम फलदायी आहे. आज केलेल्या मेहनतीचे फळ येत्या काळात यशाच्या रूपात मिळेल. नोकरीच्या स्थितीत सुधारणा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. आज पूर्वीच्या गुंतवणुकीतूनही धनलाभ होईल.


Disclaimer
या लेखात दिलेली माहिती ज्योतिष्यांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचना म्हणूनच घ्यावे.

Read more Photos on

Recommended Stories