मुलांना संध्याकाळच्या नाश्तावेळी हेल्दी अशी मोड आलेल्या मटकीची भेळ करुन देऊ शकता. यासाठी मटकी उकडवून घेऊन त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि लिंबाचा रस वापरुन भेळ तयार करा.
झटपट आणि सोपी अशी आप्पेची रेसिपी मुलांना संध्याकाळच्या नाश्तामध्ये करू शकता. या रेसिपीसाठी रवा आणि दहीचे मिश्रण तयार करुन त्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर या भाज्यांचा वापर करू शकता.
हेल्दी असा खमण ढोकळा मुलांना शाळेतून आल्यानंतर खायला देऊ शकता. ढोकळ्यासोबत हिरव्या मिरचीची चटणीही सर्व्ह करा.
कोबी, फरसबी, गाजर, कांदा, मिरची आणि टोमॅटोसह तुमच्या पसंतीच्या भाज्या वापरुन संध्याकाळच्या नाश्तासाठी व्हेजिटेबल पॅटीस तयार करू शकता.
हेल्दी आणि पौष्टिक नाश्तामध्ये उत्तमपची रेसिपी करू शकता. या रेसिपीसोबत खोबऱ्याची तिखट चटणी तयार करा.
वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मुलांना शाळेतून आल्यानंतर नाश्तासाठी देऊ शकता.
हेल्दी आणि पौष्टिक अशी बदाम केळ्याची स्मूदी मुलांना नक्की द्या. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहिल आणि शरिराला काही महत्वाची पोषण तत्त्वेही मिळतील.