रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा नारळाचे तेल, वाचा भन्नाट फायदे

Published : Apr 10, 2025, 08:52 AM IST

Coconut Oil Benefits for Skin : नारळाचे तेल केसांसाठी बहुतांशजण वापरतात. पण त्वचेसाठी देखील नारळाचे तेल फायदेशीर असल्याचे मानले जाते. जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला नारळाचे तेल लावण्याचे फायदे सविस्तर...

PREV
16
त्वचेच्या आरोग्याची काळजी

त्वचेची काळजी घेण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर जुन्या काळापासून केला जात आहे. प्रत्येकजण नारळाचे तेल वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात.

26
नारळाच्या तेलामधील पोषण तत्त्वे

नारळाच्या तेलामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. पण रात्री झोपण्यापूर्वी नारळाचे तेल लावण्याचे काय फायदे आहेत हे पुढे जाणून घेऊया.

36
कोरड्या त्वचेपासून सुटका

नारळाच्या तेलामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी नारळाचे तेल चेहऱ्याला लावल्याने कोरड्या त्वचेसंदर्भातील समस्या दूर होण्यास मदत होईल.

46
ओलसरपणा टिकून राहिल

रात्री चेहऱ्याला नारळाचे तेल लावल्याने त्वचेमधील ओलसरपणा टिकून राहण्यास मदत होईल. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी नारळाचे तेल त्वचेला लावल्यास कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास त्वचा मऊसरही होईल.

56
सुरकुत्यांपासून सुटका

नारळाच्या तेलाचा वापर करून सुरकुत्यांच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. नाइट स्किन केअर रुटीनमध्ये दररोज नारळाच्या तेलाचा वापर केल्याने सुरकुत्यांच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होईल.

66
असा करा वापर

सर्वप्रथम चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यानंतर चेहरा पुसून घ्या. आता चेहऱ्याला नारळाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तेल त्वचेमध्ये मुरले जाईल. याशिवाय तेलात व्हिटॅमिन ई तेल मिक्स केल्यासही त्वचेचे आरोग्य राखले जाईल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Recommended Stories