Char Dham Yatra हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कशी कराल? बुकिंग, भाड्यासह जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

Char Dham : अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर उत्तराखंडमधील केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. तर 12 मे पासून बद्रिनाथ मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चार धाम यात्रा करण्याचा विचार करताय? 

Chanda Mandavkar | Published : May 13, 2024 4:26 AM IST / Updated: May 13 2024, 10:00 AM IST

Char Dham Yatra 2024 : चार धाम यात्रेला 10 मे पासून सुरुवात झाली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उत्तराखंडमधील केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री आणि बद्रिनाथ मंदिराचे दर्शन घेत चार धामची यात्रा पूर्ण करतात. चार धाम यात्रेसाठी पायी चालत प्रवास न जमणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टरची सेवा उपलबध करुन दिली जाते. अशातच तुम्ही देखील चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टरने जायचा विचार करत असल्यास त्यासाठी भाडे किती, कसे बुकिंग करायचे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

कसे करायचे बुकिंग?
आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत संकेतस्थळावरुन चारधाम यात्रेसाठी तिकीट बुकिंग करु शकता. याशिवाय चार धाम यात्रेसाठी तिकीट बुकिंग शुल्क, कधी बुकिंग करायचे याबद्दल जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

हेलिकॉप्टर बुकिंग वेळ
आयआरसीटीची हेलिकॉप्टर सेवेचा लाभ heliyatra.irctc.co.in च्या माध्यमातून घेता येणार आहे. सध्या हेलिकॉप्टर सेवा 10 मे पासून ते 20 जून आणि 15 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबरपर्यंत भाविकांसाठी उपलब्ध असणार आहे. आयआरसीटीसीनुसार 21 जून पासून 14 सप्टेंबरपर्यंतच्या प्रवासाच्या तारखा लवकरच जाहिर केल्या जातील.

सर्वप्रथम रजिस्ट्रेशन महत्त्वाचे
हेलिकॉप्टरन सेवेसाठी ऑनलाइन बुकिंग करताना उत्तराखंड सरकारच्या पोर्टलर चार धाम यात्रेसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. आधी कधी रजिस्ट्रेशन केले नसल्यास registrationandtouristcare.uk.gov.in येथे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

कसे कराल बुकिंग

आणखी वाचा : 

Char Dham Yatra 2024 : चारधाम यात्रेला जाणार आहात? या 7 गोष्टींची घ्या काळजी

Char Dham Yatra 2024 : नोंदणी न करता यात्रेला जाताय ? तर हे तुमच्यासाठी नक्की वाचा

Share this article