चाणक्य नीतीनुसार, नवरा-बायकोच्या नात्यात कोणी एक जरी प्रामाणिक नसेल, तर ते नातं जास्त काळ टिकत नाही. खोटं बोलणं किंवा फसवणूक करणं, स्वार्थी असणं, कौटुंबिक निर्णयात सहभागी न होणं, इतरांसमोर एकमेकांचा आदर न करणं, कौटुंबिक परंपरा आणि सामाजिक नियमांचं पालन न करणं, या गोष्टींमुळेही लग्नाच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास कमी होतो. सुरुवातीला या लहान समस्या वाटल्या तरी, हळूहळू त्या मोठ्या भांडणांना कारणीभूत ठरतात.