18
मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी द्या हे सात पदार्थ
मुलांचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. काही खास प्रकारचे पदार्थ मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ...
Subscribe to get breaking news alertsSubscribe 28
मुलांना रोज दही दिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते
दह्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. दह्यातील प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारशक्तीला चालना देतात.
38
बदामामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते
बदाम व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
48
अंडी व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे
अंडी व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. इतकेच नाही तर अंड्यांमध्ये सेलेनियमसारखे अनेक पोषक तत्व असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
58
नाचणीमध्ये इम्युनिटी वाढवणारे अनेक घटक असतात
नाचणीमध्ये आवश्यक फॅट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. नाचणीत कॅल्शियम भरपूर असते. यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे काही घटकही असतात.
68
बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने इम्युनिटी वाढते
बेरीजमध्ये अँथोसायनिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते.
78
संत्र्यामुळे बौद्धिक क्षमता सुधारते
संत्र्यामध्ये आढळणाऱ्या अनेक फ्लेव्होनॉइड्सपैकी हेस्पेरिडिन आणि नॅरिरुटिन हे दोन आहेत. संत्री आणि संत्र्याचा रस यांसारखी पेये बौद्धिक क्षमता सुधारतात.
88
ओट्समधील पोषक तत्त्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
ओट्समधील उच्च फायबरमुळे स्मरणशक्ती आणि ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते.