Biryani History : 'बिर्याणी' शब्दाचा अर्थ काय? इतिहास वाचाल तर थक्क व्हाल

Published : Oct 31, 2026, 04:27 PM IST

Biryani History: भारतात बिर्याणीची क्रेझ जबरदस्त आहे. छोट्या टपरीपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत सगळीकडे बिर्याणी भाव खाऊन जाते. पण बिर्याणी हा फक्त एक पदार्थ नाहीये. याच्या मागे शेकडो वर्षांचा रंजक इतिहास दडलाय, हे तुम्हाला माहितीये का?

PREV
15
बिर्याणी हे नाव कसं पडलं?

बिर्याणी हा शब्द पर्शियन भाषेतून आलाय. पर्शियन भाषेत 'बिरियन' म्हणजे शिजवण्यापूर्वी भाजणे आणि 'बिरिंज' म्हणजे तांदूळ. या दोन शब्दांतूनच बिर्याणी हे नाव तयार झालंय. सुरुवातीच्या काळात तांदूळ तुपात भाजून, त्यात मांस मिसळून ते संथ आचेवर शिजवत असत. तांदूळ, मांस आणि खडे मसाले एकत्र शिजवण्याची ही पद्धत हळूहळू विकसित झाली. पण बिर्याणी हे नाव नेमकं कसं पडलं आणि हा पदार्थ पहिल्यांदा कुठे तयार झाला, यावर अनेक ऐतिहासिक कथा प्रचलित आहेत.

25
पर्शिया ते मुघल काळ

बिर्याणीचा इतिहास सांगताना पर्शियन खाद्यसंस्कृतीचा उल्लेख नक्की येतो. पर्शियातील प्रसिद्ध 'पुलाव' या पदार्थाचा बिर्याणीवर मोठा प्रभाव पडलाय. मुघल भारतात आल्यावर त्यांनी पर्शियन खाद्यसंस्कृती आणि भारतीय मसाले यांचा सुरेख मेळ घातला. राजदरबारातील आचारी स्थानिक तांदूळ, मसाले आणि औषधी वनस्पती वापरून नवनवीन पदार्थ बनवत असत. दही, केशर, तूप आणि सुगंधी मसाले वापरून त्यांनी बिर्याणीला अधिक चविष्ट बनवलं. मुघल काळात राजवाड्यांमध्ये या पदार्थाला खूप महत्त्व मिळालं आणि नंतर तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला.

35
मुमताज महल आणि बिर्याणी

बिर्याणीच्या इतिहासात मुमताज महलची एक रंजक कथा सांगितली जाते. मुघल सम्राट शाहजहानची पत्नी मुमताज महलने एकदा सैनिकांच्या छावणीला भेट दिली होती. तिथे योग्य जेवण न मिळाल्याने सैनिक कमकुवत झाल्याचं तिच्या लक्षात आलं. सैनिकांना ताकद मिळावी म्हणून तिने शाही आचाऱ्यांना तांदूळ आणि मांस वापरून एक पौष्टिक पदार्थ बनवण्याचा आदेश दिला. यातूनच बिर्याणीचा जन्म झाला, असं अनेकजण मानतात.

45
'आईन-ए-अकबरी' मधील उल्लेख

बिर्याणीचा इतिहास समजून घेण्यासाठी मुघल सम्राट अकबराच्या काळातील 'आईन-ए-अकबरी' हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. १६ व्या शतकात अबुल फजलने लिहिलेल्या या ग्रंथात शाही स्वयंपाकघरात बनणाऱ्या तांदळाच्या विविध पदार्थांचा उल्लेख आहे. यातील काही पदार्थ आजच्या बिर्याणीचे सुरुवातीचे रूप मानले जातात. त्याकाळी पुलावसोबतच तांदळाचे इतरही अनेक पदार्थ बनवले जायचे. काळानुसार त्यांच्या बनवण्याच्या पद्धतीत आणि साहित्यात बदल होत गेले.

55
भारतात बिर्याणी इतकी खास का?

भारतात आल्यावर बिर्याणी फक्त एकाच चवीपुरती मर्यादित राहिली नाही. प्रत्येक राज्याच्या खाद्यसंस्कृतीनुसार तिने नवीन रूप घेतलं. हैदराबादी बिर्याणी मसाल्यांचा झणझणीतपणा आणि सुगंधासाठी ओळखली जाते. लखनवी बिर्याणी संथ आचेवर शिजवण्याच्या पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे, तर कोलकाता बिर्याणीत बटाट्याला खास महत्त्व असतं. आज बिर्याणी फक्त भारतातच नाही, तर जगभरात लोकप्रिय झाली असून चिकन, मटण आणि व्हेज बिर्याणी असे तिचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories