दिवाळीच्या सणासाठी डी-मार्टमधून किराणा सामान, मिठाई आणि घरातील वस्तू खरेदी करण्याचा विचार करताय? मग तुम्ही कोणत्या दिवशी आणि किती वाजता तिथे जाता, हे खूप महत्त्वाचं आहे.
दिवाळी जवळ आली की दुकानांमध्ये लोकांची गर्दी वाढते. नवीन कपडे, किराणा सामान, मिठाई, घरातील वस्तू आणि सजावटीचं सामान खरेदी करण्यासाठी लोक दुकानात जातात. कमी पैशात चांगल्या वस्तू मिळवण्यासाठी अनेक जण डी-मार्टला पसंती देतात. पण सणासुदीच्या काळात तिथे खूप गर्दी असते. त्यामुळे योग्य दिवस आणि वेळ निवडणं गरजेचं आहे. असं केल्यास तुम्ही रांगेत न थांबता आरामात खरेदी करू शकता.
25
शेवटच्या क्षणी खरेदी करणं टाळा
दिवाळीच्या अगदी आदल्या दिवशी खरेदीला जाणं टाळा. त्याऐवजी सणाच्या दोन-तीन दिवस आधीच डी-मार्टमध्ये जाण्याचं प्लॅनिंग करा. शेवटच्या क्षणी गेलात तर काही महत्त्वाच्या वस्तू संपलेल्या असू शकतात. शिवाय, ग्राहकांची गर्दी जास्त असल्याने तुम्हाला प्रत्येक वस्तू निवांतपणे निवडता येत नाही. त्यामुळे आधीच सामानाची लिस्ट तयार करून ठेवणं फायद्याचं ठरतं.
35
सकाळी गेलात तर गर्दीतून वाचाल
डी-मार्टमध्ये जाण्याची वेळही खूप महत्त्वाची असते. विशेषतः सकाळी लवकर जाणं हा एक उत्तम पर्याय आहे. या वेळेत तिथे तुलनेने कमी गर्दी असते. त्यामुळे तुम्ही घाई न करता हव्या त्या वस्तू निवडू शकता. दुपार आणि संध्याकाळच्या वेळी ग्राहकांची संख्या वाढते. जे लोक कामावर जातात, ते संध्याकाळी खरेदीला येतात. त्यामुळे वस्तू घेण्यासाठी आणि बिल भरण्यासाठी तुम्हाला खूप वेळ थांबावं लागू शकतं.
शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी अनेक जण कुटुंबासोबत खरेदीला निघतात. यामुळे डी-मार्टमध्ये खूप गर्दी होते. त्यामुळे शक्यतो सोमवार ते शुक्रवार या वर्किंग डेजमध्ये खरेदीला जा. त्यातही आठवड्याच्या मधल्या दिवसांत सकाळी गेलात, तर गर्दी नक्कीच टाळता येईल. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि तुम्ही आरामात खरेदीही करू शकाल.
55
आधीच प्लॅनिंग करणं आहे महत्त्वाचं
दिवाळीची खरेदी व्यवस्थित पार पाडण्यासाठी आधीच प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सामानाची लिस्ट बनवा आणि सणाच्या दोन-तीन दिवस आधीच दुकानात जा. आठवड्याच्या मधल्या दिवसांत सकाळी जाण्याला प्राधान्य द्या. यामुळे शेवटच्या क्षणाचं टेन्शन आणि लांबच लांब रांगा टाळता येतील. अर्थात, प्रत्येक ठिकाणानुसार दुकानातील गर्दी कमी-जास्त असू शकते. गर्दी टाळण्यासाठी या फक्त काही टिप्स आहेत; ठराविक वेळेत डिस्काउंट मिळेलच याची ही गॅरंटी नाही.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.