लहान मुलांना प्लास्टिक बॉटलमधून दूध पाजता? होऊ शकतो हा गंभीर आजार

Published : Mar 20, 2025, 03:21 PM IST
baby bottle syndrome

सार

Baby bottle syndrome : बहुतांश लहान मुलांना प्लास्टिकच्या बॉटलमधून दूध पाजले जाते. पण यामुळे मुलाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हे माहितेय का? खरंतर, बॉटलमधून दूध पाजल्याने त्यांना बेबी बॉटल सिंड्रोम होऊ शकतो.

Baby bottle syndrome : तुमचे मुलं दीर्घकाळ बॉटलमधून दूध पित असल्यास त्याला बेबी बॉटल सिंड्रोम होण्याचा धोका वाढला जातो. या सिंड्रोमला बेबी बॉटल टूथ डेक नावानेही ओखळले जाते. नवजात मुलं किंवा मुलांमध्ये ही समस्या सामान्य आहे. ही समस्या अशावेळी उद्भवली जाते जेव्हा तोंडातील बॅक्टेरिया दूध, फॉर्म्युला मिल्क किंवा अन्य गोड पदार्थांचे सेवन करतात. यामुळे जे अ‍ॅसिड तयार होते ते हळूहळू दातांना नुकसान पोहोचवते. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मुलाचे ओरल हेल्थ बिघडू शकते.

बेबी बॉटल टूथ डेकेचे मुख्य कारण म्हणजे दूध किंवा गोड पदार्थांचे दीर्घकाळ सेवन करणे. खासकरुन रात्री झोपण्यापूर्वी खूपवेळ तोंडात दूधाची बॉटल ठेवल्याने ही समस्या उद्भवू शकते. यामुळे तोंडाचे आरोग्य बिघडले जाते. याशिवाय मुलांचे दात किडण्यासही सुरुवात होते.

बेबी बॉटल सिंड्रोमपासून असे रहा दूर

बेबी बॉटल सिंड्रोमपासून दूर राहण्यासाठी मुलांना ब्रेस्ट फिडिंगच करावे असा सल्ला दिला जातो. आई-वडिलांनी मुलांना दूध बॉटलमधून पाजू नये. कारण मुलं दीर्घकाळ बॉटल तोंडात धरुन ठेवत असल्याने दूधातील द्रव पदार्थ दीर्घकाळ तोंडात राहिले जातात.

असे करा फिडिंग

12-14 महिन्यातील मुलांना बॉटलमधून दूध पिण्याची सवय सोडण्यासाठी कपच्या माध्यमातून दूध पिण्यास शिकवावे. दूध प्यायल्यानंतर दररोज ओलसर कापडाने तोंड स्वच्छ पुसून घ्यावे. याशिवाय मुलाचा पहिला दात आल्यानंतर मुलांसाठी फ्लोराइड टूथपेस्टसह मुलांसाठी येणाऱ्या खास ब्रशचा वापर करावा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

PREV

Recommended Stories

फक्त ७ डिझाईन्स! जडाऊ गोल्ड प्लेटेड इअरिंग्ज जे प्रत्येक लुकला देतील रॉयल टच; तुम्हीही लगेच ट्राय करा!
घरीच पिकवा, ताजी खा! हिवाळ्यात कमी कष्टात आणि कमी जागेत येणाऱ्या 'या' ७ सुपर हेल्दी भाज्या!