घरच्याघरी नॅच्युरल प्रोडक्ट्स वापरुन अशी तयार करा मेंदी, चमकदार होतील केस

Home made mehndi : बहुतांश महिला पांढऱ्या केसांवर मेंदी लावतात किंवा हातापायावर मेंदी काढतात. अशातच मार्केटमध्ये मिळणाऱ्या मेंदीचा रंग कधीकधी केसांना व्यवस्थितीत येत नाही. याशिवाय केसांचे नुकसान होण्याचीही शक्यता असते. 

Home made mehndi : भारतीय संस्कृतीमध्ये केसांना मेंदी लावणे एक परंपरा आणि महत्वाचा भाग आहे. सणासुदीला किंवा लग्नसोहळा अशा खास वेळी मेंदीशिवाय उत्साह अपूर्ण वाटतो. महिला आपल्या हातापायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी मेंदी काढतात. पण मार्केटमध्ये मिळणाऱ्या मेंदीमुळे कधीकधी त्वचेचे नुकसान होऊ शकते.

मेंदीचा रंग अधिक गडद आणि दीर्घकाळ टिकून रहावा असे वाटत असल्यास घरच्याघरी नॅच्युरल प्रोडक्ट्स वापरुन मेंदी तयार करू शकता. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.

घरच्याघरी अशी तयार करा मेंदी

  • सर्वप्रथम नॅच्युरल मेंदी घ्या. यासाठी मार्केटमधून ऑर्गेनिक मेंदी पावडर खरेदी करू शकता. अन्यथा घरच्या आजूबाजूला मेंदीचे झाड असल्यास त्याच्या पानांपासून पावडर तयार करू शकता. यानंतर मेंदीला गडद रंग येण्यासाठी मेंदी पावडरमध्ये आवळा, लिंबाचा रस, चहा किंवा कॉफी मिक्स करू शकता.
  • मेंदी तयार करण्याची कृती
  • सर्वप्रथम मेंदीची पाने घेऊन उन्हात सुकवा. पाने पुर्णपणे सुकल्यानंतर वाटून घेत बारीक पावडर तयार करा. अन्यथा मेंदी पावडर असल्यास याचा थेट वापर करू शकता.
  • एका वाटीत मेंदी पावडर घ्या. यामध्ये 1 चमचा आवळा पावडर, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा कॉफी पावडर. याशिवाय चहाचे पाणी किंवा लवंग घालून याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट रात्रभरत 6-8 तासांसाठी भिजत ठेवा. जेणेकरुन मेंदीचा रंग अधिक गडद होईल.
  • मेंदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. हातावर निलगिरी तेल किंवा पायांना लावू शकता. जेणेकरुन मेंदीचा रंग अधिक गडद येईल. तयार करण्यात आलेली मेंदी कोनमध्ये भरुन वापरू शकता.

 

 

Share this article