Astrology Remedy For Money: आर्थिक समस्यांपासून हवीय सुटका? असा करा हळदीचा उपाय

Published : Nov 20, 2023, 08:33 PM ISTUpdated : Nov 20, 2023, 08:46 PM IST

Astrology Remedy For Money : पैशांशी संबंधित सर्व समस्यांमधून हवीय सुटका? मग जाणून घ्या सोपा उपाय…

PREV
18
लाभकारी हळद

पैसा कमावण्यासाठी सर्वच जण खूप कष्ट करत असतात. पण कधी-कधी कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे आपला स्वतःचा हक्काचा-मेहनतीचा पैसा अडकतो. कित्येक प्रयत्न करूनही वर्षानुवर्षे अडकलेला आपलाच पैसा आपल्यालाच मिळत नसल्याने जीवनात मोठा तोटा झाल्याचा विचाराही डोक्यात अनेकदा डोकावतो. 

पण ज्योतिषाचार्यांनी सांगितलेले साधेसोपे उपाय केल्यास आपणास नक्की धनलाभ होऊ शकतो. असाच काहीसा उपाय ज्योतिषाचार्य डॉ. लतिका शर्मा यांनी शेअर केला आहे. 

28
तज्ज्ञांनी सांगितलेला उपाय

लतिका शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही पूजेमध्ये हळदीचा वापर करण्याची परंपरा आहे. ज्योतिष शास्त्रातही हळद खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे नशीब उजळण्यास मदत मिळू शकते. जाणून घेऊया ज्योतिषाचार्य डॉ. लतिका शर्मा यांनी सांगितलेला उपाय.

38
पैसा अडकल्याने आहात त्रस्त?

कधी एखाद्या ठिकाणी कष्टाने कमावलेले पैसे अडकतात. तर कधी एखाद्याला मदत म्हणून दिलेला पैसाही पुन्हा लवकर मिळत नाही. एकूणच आपल्या हक्काची लक्ष्मी आपल्याकडे येत नाही. आयुष्यातील आर्थिक समस्यांमुळे आपणही त्रस्त झाले आहात का? तर मग डॉ. लतिका शर्मांनी सांगितलेला हळदीचा उपाय नक्की जाणून घ्या.

48
हक्काचा पैसा अडकलाय का?

दीर्घकाळापासून तुमचेही स्वतःचे पैसे अडकले आहेत का? काही केल्या तुम्हाला तुमचे पैसे मिळत नाहीयेत का? 

58
असा करा हळदीचा उपाय

डॉ. लतिका शर्मा यांनी सांगितलेल्या उपायानुसार, तुमचे हक्काचे पैसे पुन्हा मिळवण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्या आणि हळदीमध्ये व्यवस्थित मिक्स करा, त्यास पिवळा रंग येऊ द्यावा.

68
लाल कापड

हळद लावलेले तांदूळ एका लाल कापडामध्ये बांधून ते आपल्या पर्समध्ये ठेवा.

78
धनलाभ

हा उपाय केल्यास काही दिवसांतच तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे पुन्हा मिळू शकतील, अशी माहिती डॉ. लतिका यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

Content Credit Instagram @astrologerlatikasharma

आणखी वाचा : 

Bhaubeej 2023 : बहिणीने टिळा लावल्यास कसा होतो भावाचा भाग्योदय?

VIDEO कोयता किंवा मशीनचा वापर न करता कसा फोडावा नारळ? पाहा सोपी पद्धत

चहा की कॉफी, आरोग्यास सर्वाधिक हानिकारक असलेले पेय कोणते?

88
DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Recommended Stories