DIY Sheet Mask : जर तुम्ही आठवड्यातून २-३ वेळा हा घरगुती शीट मास्क वापरला, तर त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करेल, डलनेस कमी होईल आणि चेहऱ्यावर ताजेपणा दिसेल.
शीट मास्क स्किनकेअर रूटीनचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. बाजारात मिळणाऱ्या शीट मास्कची किंमत ८०-१०० रुपयांपासून सुरू होते, पण तुम्ही घरच्या घरी फक्त १० रुपयांत एक प्रभावी शीट मास्क बनवू शकता. यासाठी कोणत्याही महागड्या उत्पादनाची गरज नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरातील नैसर्गिक घटकांची आवश्यकता आहे. हे केवळ स्वस्त आणि सुरक्षितच नाही, तर त्वचेला खोलवर पोषणही देतात.
घरी शीट मास्क कसा बनवायचा?
कॉटन किंवा मऊ टिश्यू पेपर (चेहऱ्याच्या आकारात कापून घ्या)
१ वाटी गुलाबजल (Rose Water)
१ चमचा कोरफड जेल (एलोवेरा जेल)
½ चमचा मध
½ लिंबाचा रस (तेलकट त्वचेसाठी) किंवा नारळ तेलाचे २ थेंब (कोरड्या त्वचेसाठी)
शीट मास्क बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
एका वाटीत गुलाबजल, कोरफड जेल आणि मध चांगले मिसळा.
त्वचा तेलकट असेल तर लिंबाचा रस घाला. त्वचा कोरडी असेल तर नारळ तेल मिसळा.
आता कॉटन टिश्यू किंवा शीट या मिश्रणात बुडवून २-३ मिनिटे भिजवून ठेवा.
शीट चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटे तसंच राहू द्या.
त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.
घरगुती शीट मास्कचे फायदे
गुलाबजल त्वचेला ताजे आणि हायड्रेट करते.
कोरफड जेल कूलिंग इफेक्ट देतं आणि त्वचेला दुरुस्त करतं.
मधामुळे त्वचा मऊ होते आणि नैसर्गिक चमक येते.
लिंबामुळे डार्क स्पॉट्स आणि तेलकटपणा नियंत्रित होतो.
नारळ तेल कोरड्या त्वचेला खोलवर मॉइश्चराइझ करते.
हा शीट मास्क अधिक चांगला का आहे?
बाजारातील शीट मास्कमध्ये केमिकल्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात, तर हा पूर्णपणे नैसर्गिक आहे. महागडे शीट मास्क वारंवार खरेदी करणे खिशाला जड जाऊ शकते, पण स्वयंपाकघरातील घटकांपासून बनवलेला हा DIY मास्क खूप किफायतशीर आहे. प्रत्येक त्वचेच्या प्रकारानुसार तो कस्टमाइझ केला जाऊ शकतो.