Tomato Benefits : 90 दिवस रोज टोमॅटो खाल्ले, रिपोर्ट बघून तुम्हीही ही भाजी सोडणार नाही

Published : Sep 14, 2026, 07:17 PM IST
Tomato Benefits : 90 दिवस रोज टोमॅटो खाल्ले, रिपोर्ट बघून तुम्हीही ही भाजी सोडणार नाही

सार

तुम्ही रोज टोमॅटो खाता का? एका स्टडीमध्ये ४२ लोकांनी ९० दिवस रोज टोमॅटो खाल्ले आणि त्याचे जे परिणाम समोर आले ते खूपच आश्चर्यकारक आहेत. हा रिपोर्ट वाचल्यावर तुमच्या जेवणात टोमॅटो नक्कीच सामील होईल.

मुंबई : भारतात टोमॅटोचे भाव कधी गगनाला भिडतात तर कधी एकदम खाली येतात, पण एक गोष्ट नक्की की आपल्या स्वयंपाकघरात टोमॅटो असतोच. पण तुम्ही रोज टोमॅटो खाता का? आणि असं रोज खाल्ल्यावर काय होतं? हेच शोधण्यासाठी काही संशोधकांनी एक स्टडी केली. यात ४२ लोकांनी तब्बल ९० दिवस रोज टोमॅटो खाल्ले. आणि याचा जो रिझल्ट समोर आला, तो खरंच आश्चर्यकारक आहे.

मेंदू होतो अधिक तेज

या स्टडीमध्ये ४० ते ५० वयोगटातील लोकांचा समावेश होता. खरंतर ४७ लोकांनी सुरुवात केली, पण ४२ जणांनी ९० दिवसांचा टप्पा पूर्ण केला. यानंतर असं दिसून आलं की, या लोकांचा मेंदू पूर्वीपेक्षा जास्त तेज आणि चपळ झाला होता. त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता (focus) वाढली होती. मेंदूच्या कामाचा वेगही वाढला होता. इतकंच नाही, तर त्यांच्या स्मरणशक्त्तीतही थोडी वाढ झाली होती.

मेंदू राहतो सक्रिय

जुन्या घटना, नावं आठवण्याची त्यांची ताकद वाढली होती. ज्या ४२ लोकांनी टोमॅटोची पेस्ट खाल्ली, त्यांना कोणत्याही विषयावर जास्त चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येत होतं. याचं कारण म्हणजे टोमॅटोमध्ये असलेलं 'लायकोपीन' (Lycopene) नावाचं एक महत्त्वाचं तत्व. हे तत्व शरीरातील रक्ताभिसरण आणि मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत करतं. तसंच सूज, वेदना आणि शरीराला हानी पोहोचवणाऱ्या घटकांशी लढतं. यामुळे मेंदूची ताकद, कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. टोमॅटो खाणं मेंदूसाठी किती फायदेशीर आहे, हे या स्टडीमधून स्पष्ट झालं आहे.

फक्त मेंदूच नाही, तर इतर आरोग्याच्या दृष्टीनेही टोमॅटो खाणं खूप चांगलं आहे. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराचं आरोग्यही सुधारतं. रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढते, असंही या स्टडीत म्हटलं आहे. हा रिपोर्ट वाचल्यावर आता प्रत्येकाच्या जेवणात टोमॅटो नक्कीच सामील होईल.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Gold Earrings : फक्त 3 ग्रॅममध्ये मिळणारे सुंदर झुमके, पाहा डिझाईन्स
Blood Sugar Control : शुगर कंट्रोल करायचीय? रोज ही 5 पेये पिणे टाळा