18
या ७ पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात
व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळतात. चला जाणून घेऊया ही पोषक तत्वे कोणती आहेत.
Subscribe to get breaking news alertsSubscribe 28
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. यासाठी मशरूम, संत्र्याचा रस, अंडी, फॅटी फिश यांसारखे पदार्थ खा.
38
आयर्न (लोह)
शरीरात लोहाची कमतरता असल्यासही केस गळतात. यासाठी पालक, कडधान्ये, मांस, नट्स आणि बिया यांचे सेवन करा.
48
बायोटिन (व्हिटॅमिन बी7)
केसांच्या वाढीसाठी बायोटिनयुक्त पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. नट्स, बिया, अंडी, मशरूम, रताळे, सॅल्मन फिश, कडधान्ये खा.
58
व्हिटॅमिन बी12
व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळेही केस गळतात. त्यामुळे आहारात दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाचा समावेश करा.
68
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळेही केस गळू शकतात. यासाठी लिंबूवर्गीय फळे, बेरी यांसारख्या फळांचा आहारात समावेश करा.
78
ओमेगा-3 फॅटी ॲसिड
ओमेगा-3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खाल्ल्याने केसांची वाढ होते. यासाठी जवस, चिया सीड्स, अक्रोड यांचा आहारात समावेश करा.
88
झिंक
झिंक केसगळती रोखण्यास आणि केसांच्या वाढीस मदत करते. भोपळ्याच्या बिया, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, पालक यांमध्ये झिंक असते.