गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यास, लगेच रेग्युलेटर बंद करा. यामुळे गळती थांबण्यास मदत होते.
गॅस गळती झाल्यास लगेच खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. यामुळे आग लागण्याचा धोका कमी होतो.
गॅस गळती होत असताना विजेची उपकरणे वापरू नका. यामुळे स्पार्क होऊन आग लागण्याचा धोका असतो.
जर गॅस गळती कमी असेल, तर लगेच गॅस सिलेंडर बाहेर काढून ठेवा. नंतर ओल्या कापडाने सिलेंडर झाकून ठेवा.
अशा परिस्थितीत स्वतः उपाय करणे टाळावे. त्याऐवजी, तज्ज्ञांची मदत घ्यावी.
गॅस शेगडी तिरकी न ठेवता सरळ ठेवा. हवा खेळती राहील अशी जागा निवडा. यामुळे गॅस गळती झाल्यास अपघाताचा धोका कमी होतो.
Rameshwar Gavhane