Diwali Rangoli Designs : दिवाळीत प्रत्येकजण दारापुढे सुंदर रांगोळी काढून घराची शोभा वाढवतात. अशातच यंदाच्या दिवाळीत झटपट काढून होणाऱ्या आणि आकर्षक अशा काही रांगोळी डिझाइन्स पाहूया…
टाइल रांगोळी
टाइल रांगोळी ही एक खूप वेगळ्या प्रकारची रांगोळी डिझाइन आहे. यात पांढऱ्या टाइल्स सजवून त्यावर काचेच्या पेंटिंगने चित्र काढले जाते. ही रांगोळी घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी काढता येते.
25
टेराकोटा पान रांगोळी
टेराकोटा पान रांगोळी
या प्रकारच्या रांगोळी डिझाइनमध्ये मध्यभागी एक मुख्य डिझाइन तयार केली जाते आणि त्याच्या चारही बाजूंना पानाच्या आकाराचे डिझाइन काढले जाते. त्यानंतर आजूबाजूला दिव्यांनी सजावट केली जाते.
35
फुलांची रांगोळी
फुलांची रांगोळी
चला, या दिवाळीला हर्बल बनवूया. रासायनिक रंग आणि इतर उत्पादने वापरण्याऐवजी, वेगवेगळ्या रंगांची फुले आणि पानांनी सुंदर रांगोळी सजवूया. ही रांगोळी काढण्यासाठी तुम्ही मुलांचीही मदत घेऊ शकता.
मिरर रांगोळी
या दिवाळीत रांगोळीला थोडी रिफ्लेक्टिव्ह चमक का देऊ नये? रांगोळीमध्ये छोटे आरसे जोडून तिला एक वेगळा लुक देता येतो. आजकाल मिरर रांगोळी खूप ट्रेंडमध्ये आहे.
55
कुंदन आणि स्टोन रांगोळी
कुंदन आणि स्टोन रांगोळी
यंदा रंगांऐवजी कुंदन आणि स्टोन्सची रांगोळी काढून बघा. ही रांगोळी सर्वांना आकर्षित करते. तुम्ही ती घराच्या आतही काढू शकता. यासाठी तुम्ही चिकटणारे मोती, कुंदन आणि स्टोन वापरून छान डिझाइन तयार करा.