वॉशिंग मशीनमध्ये चादर धुताना या 5 गोष्टींची घ्या काळजी

Published : Dec 17, 2024, 07:57 AM IST
Bed Sheet Wash Tips

सार

थंडीच्या दिवसात आपल्या अंथरुणाची स्वच्छता राखणे फार महत्वाचे असते. खासकरुन चादर व्यवस्थितीत धुतल्यानंतर सुकवणे टास्क असतो. पण तुम्हाला माहितेय का, मळलेल्या किंवा अस्वच्छ अंथरुणामुळेही काही आजार मागे लागू शकतात?

Bed Sheet Wash Tips : थंडीच्या दिवसात शरिराची हालचाल मंदावली जाते. यामुळे दिवसभरातील बहुतांशवेळ बेडवर झोपून घालवला जातो. बेडवर असणारी मऊसर चादर, उशी आरामदायी वाटतात. पण दररोज चादर, उशीचा वापर केल्यानंतर त्याची वेळोवेळी स्वच्छता राखणे फार महत्वाचे असते. अन्यथा चादर, उशीवर जमा झालेली धूळ आरोग्यासंबंधित काही समस्या निर्माण करू शकतात. अशातच वॉशिंग मशीनमध्ये चादर धुताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

चादर का धुवावी?

  • अस्थमा किंवा एखादी अ‍ॅलर्जी असल्यास चादर प्रत्येक आठवड्याला धुवावी.
  • त्वचा संवेदनशील असल्यास
  • अत्याधिक शरिरातून घाम निघत असल्यास
  • पाळीव प्राणी चादरीवर झोपत असल्यास
  • चादरीवर अन्नपदार्थ पडले असल्यास
  • एखादे इंफेक्शन किंवा जखम झाली असल्यास

कितीवेळा चादर धुवावी?

सर्वसामान्यपणे चादर दोन आठवड्यातून एकदा धुवावी. याशिवाय आठवड्यातून तीन ते चार वेळा नवी चादर बेडवर घालावी.

मशीनमध्ये चादर धुण्याची योग्य पद्धत

वॉशिंग मशीनमध्ये चादर धुतली जाते. कॉटन किंवा लिनेनच्या कापडाची बेडशीट अगदी सहज वॉशिंग मशीनमध्ये धुतली जाते. पण सिल्क आणि सॅटिनची चादर धुण्यासाठी फार मेहनत करावी लागते. या चादर धुण्यासाठी थंड तापमान आणि मंद गतीवर मशीनमध्ये धुवावी. याशिवाय मशीनमध्ये चादर धुवायला टाकण्यापूर्वी थोडावेळ आधी डिटेर्जेंटच्या पाण्यात भिजत ठेवावी. जेणेकरुन चादरीला लागलेले डाग दूर होण्यास मदत होईल.

आणखी वाचा : 

New Year 2025 : नव्या वर्षात फॉलो करा आरोग्यासंबंधित हे 5 नियम, रहाल तंदुरुस्त

शरिरातील Happy Hormone वाढण्यासाठी काय करावे?

PREV

Recommended Stories

फक्त ७ डिझाईन्स! जडाऊ गोल्ड प्लेटेड इअरिंग्ज जे प्रत्येक लुकला देतील रॉयल टच; तुम्हीही लगेच ट्राय करा!
घरीच पिकवा, ताजी खा! हिवाळ्यात कमी कष्टात आणि कमी जागेत येणाऱ्या 'या' ७ सुपर हेल्दी भाज्या!